कोळसा मंत्रालय
2022-23 या वर्षांत महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये कोळसा उत्पादनात वाढ
Posted On:
31 JUL 2023 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जुलै 2023
2022-23 या वर्षात देशात कोळशाचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन झाले. 2021-22 या वर्षात 778.21 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले होते. 2022-23 या वर्षात ते उत्पादन 14.77% वाढीसह 893.19 दशलक्ष टन (तात्पुरते) इतके नोंदले गेले.
आधीच्या वर्षीच्या तुलनेत 2022-23 या वर्षात महाराष्ट्रासह आसाम, छत्तिसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये कोळसा उत्पादनात वाढ झाली आहे.
तर 2022-23 या वर्षात जम्मू काश्मीरमध्ये याच कालावधीत कोळसा उत्पादन घसरले आहे. देशांतर्गत उत्पादन/ पुरवठा याद्वारे कोळशाला असलेली देशातील गरज, मागणी पूर्ण केली जाते. देशातील कोळसा उत्पादन वाढवणे आणि कोळशाची आयात कमी करणे यावर सरकारचा भर आहे.
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1944375)
Visitor Counter : 224