परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
डिजिलॉकरद्वारे पासपोर्ट अर्ज प्रक्रिया सुलभ
Posted On:
31 JUL 2023 2:25PM by PIB Mumbai
गोवा, 31 जुलै 2023
पासपोर्ट अर्ज प्रक्रियेतील सुलभता वाढविण्याच्या दृष्टीने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पणजी यांनी सर्व अर्जदारांना www.passportindia.gov.in ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी "डिजिलॉकर" सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) येथे कागदपत्रांची विनाअडथळा पडताळणी अनुभव प्रदान करून संपूर्ण प्रक्रियेचा वेळ सुलभ आणि जलद करणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे.
डिजिलॉकर प्लॅटफॉर्मद्वारे, अर्जदार सहजपणे त्यांची आवश्यक सहाय्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात, पीएसके / पीओपीएसकेच्या भेटीदरम्यान मूळ कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती बाळगण्याची आवश्यकता नाही. ही सोयीस्कर प्रक्रिया अर्जदारांसाठी त्रासमुक्त आणि जलद आणि सुलभ पडताळणी प्रक्रिया यासाठी आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आता ऑनलाइन अर्ज सादर करताना पत्ता आणि जन्मतारखेचा वैध पुरावा म्हणून डिजिलॉकर द्वारे "आधार दस्तऐवज" स्वीकारते. जे अर्जदार पत्ता / जन्मतारखेच्या पुराव्यासाठी "आधार" सादर करतात त्यांना पोर्टलमध्ये "डिजिलॉकर अपलोड" प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
अर्जदारांना डिजिलॉकर अपलोड प्रक्रिया समजणे सुलभ व्हावे यासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करण्यात आले आहेत:
इंग्रजी : https://youtu.be/M9xPGDVHib8
हिंदी: https://youtu.be/2KiW3Do0jjM
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1944260)