पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

चेन्नई येथे झालेल्या पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांच्या बैठकीत  एक शाश्वत आणि लवचिक भविष्याच्या निर्मितीप्रति वचनबद्ध जी 20 देशांच्या एकतेचे दर्शन घडले  - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव


हवामान आणि पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाची आणि कठोर परिश्रमाची जी 20 सदस्यांनी केली प्रशंसा

Posted On: 28 JUL 2023 6:04PM by PIB Mumbai

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची चौथी आणि अखेरची बैठक तसेच  पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांची बैठक आज चेन्नई येथे पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली तसेच एका शाश्वत आणि लवचिक नील /महासागर-आधारित अर्थव्यवस्थेसाठी 'चेन्नई उच्च स्तरीय तत्त्वे ' या निष्कर्ष दस्तावेजाचा एकमताने   स्वीकार करण्यात आला. हा दस्तावेज  जी 20 नवी दिल्ली नेत्यांचा जाहीरनामा 2023 मध्ये जोडण्यासाठी नेत्यांना  अभ्यासासाठी सादर केला जाईल. मंत्र्यांनी निष्कर्ष दस्तावेज  आणि अध्यक्ष सारांश देखील स्वीकारला.

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मंत्रिस्तरीय बैठकीला अन्य देशांमधील 41 मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत जमीन आणि जैवविविधता, नील अर्थव्यवस्था , जल संसाधन व्यवस्थापन आणि चक्राकार  अर्थव्यवस्था या पर्यावरण आणि  हवामान  अंतर्गत प्राधान्य असलेल्या क्षेत्रांवर केंद्रित  महत्त्वपूर्ण कामगिरी आणि प्रमुख  उपाययोजना अधोरेखित करण्यात आल्या. या बैठकीत जी 20 सदस्य देशनिमंत्रित देशांचे  प्रतिनिधित्व करणारे 225 हून अधिक प्रतिनिधी तसेच यूएनईपी , यूएनएफसीसी , कॉप 28 आणि यूएनसीसीडी सह 23 आंतरराष्ट्रीय संघटनांचे  प्रमुख आणि प्रतिनिधी यांचा  सक्रिय सहभाग होता. जागतिक महत्त्व असलेल्या हवामान आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर आव्हानांवर  या बैठकीत चर्चा झाली.

पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला  आणि पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना आणि मंत्र्यांना संबोधून दिलेल्या  व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान आणि पर्यावरणीय आव्हानांचा सर्वांगीण पद्धतीने  सामना करण्यासाठी वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेने जी 20 देश एकत्र येतील असा  विश्वास व्यक्त केला. .

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे सुरुवातीचे भाषण पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाला अनुसरून होते.अत्यंत उच्च पातळीवरील तत्वांचा स्वीकार केल्याबद्दल त्यांनी ईसीएसडब्ल्यूजीची प्रशंसा केली. या संदर्भात करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हवामान बदल, जैवविविधताविषयक हानी, तसेच प्रदूषण यांसारख्या गुंतागुंतीच्या आणि एकमेकांशी संबंधित असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशांमध्ये सहयोगी संबंध निर्माण करण्याला त्यांनी प्रोत्साहन देत, शाश्वत आणि लवचिक भविष्याबाबत एकीकृत दृष्टीकोनाची जोपासना करण्याचे आवाहन केले.प्रत्येक देशासमोर विशिष्ठ  आव्हाने आणि क्षमता असताना, त्यांनी हवामानविषयक कृती तसेच पर्यावरणीय शाश्वतता यांच्याप्रती अतुलनीय कटीबद्धता दर्शवल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्येक देशाचे आभार मानले.

मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान, जल व्यवस्थापन, खाणकामामुळे प्रभावित क्षेत्र आणि वणव्यांमुळे प्रभावित भाग यांच्या संदर्भात सर्वोत्तम पद्धतींच्या संदर्भात संकलने विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत उपस्थित नेत्यांनी भारताच्या अध्यक्षतेचे आभार मानले. शाश्वत आणि लवचिक नील अर्थव्यवस्थाया संकल्पनेवर आधारित तांत्रिक अभ्यासविषयक प्रयत्न केल्याबद्दल तसेच पोलाद क्षेत्रातील चक्राकार अर्थव्यवस्थेबाबत माहितीची देवाणघेवाण, उत्पादकाची विस्तारित जबाबदारी, चक्राकार जैवअर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तंत्रज्ञान दस्तावेज तयार केल्याबद्दल देखील या नेत्यांनी भारताचे आभार मानले.जी-20 जागतिक भूमी उपक्रमाला बळकटी आणण्यासाठी भारतीय अध्यक्षतेने जी-20 सदस्यांच्या स्वयंसेवी स्वीकारार्थ  गांधीनगर मार्गदर्शक आराखडाआणि गांधीनगर अंमलबजावणी चौकटयांचा देखील प्रस्ताव ठेवला.

मंत्रीस्तरीय बैठकीच्या समारोप प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केले.  जी-20 मंत्री  शाश्वत आणि लवचिक भविष्य निर्माण करण्याप्रती असलेली  वचनबद्धता  एकमुखाने  व्यक्त करत आहेत, असे ते म्हणाले.  ते म्हणाले की भारताच्या जी-20 अध्यक्षतेने ईसीएसडब्ल्यूजीसाठी खालील 3 महत्त्वाच्या संकल्पना निश्चित केल्या आहेत:

•   

o     जमिनीचा ऱ्हास थांबवणे, परिसंस्थेच्या पुनर्स्थापनेला गती देणे, जैवविविधता समृध्द करणे आणि जल स्त्रोत व्यवस्थापन करणे,

o     शाश्वत आणि हवामानाप्रती लवचिक नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे,

o     साधनसंपत्तीची कार्यक्षमता आणि चक्राकार अर्थव्यवस्था यांना प्रोत्साहन देणे

***

S.Kakade/S.Kane/S.Chitnis/P.Kor

 

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943836) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu