विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
स्टार्टअप आणि कौशल्य विकास क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी जागरूकता आणि मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
28 JUL 2023 5:05PM by PIB Mumbai
स्टार्टअप आणि कौशल्य विकास क्षेत्रातील लाभ घेण्यासाठी जागरूकता आणि मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. ते आज, 28 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे "ग्लोबल अँड पेट्रोकेमिकल मॅन्युफॅक्चरिंग हब" शिखर परिषद -2023 ला संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळात हाती घेतलेल्या प्रत्येक नवीन उपक्रमाच्या केंद्रस्थानी कौशल्य, नवोन्मेष आणि संशोधन आणि विकास आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. तथापि दुर्दैवाने, भविष्यातील कौशल्यांसाठी स्वतःला सुसज्ज करण्याची आपली मानसिकता त्याच वेगाने विकसित होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नवोन्मेष आणि समृद्धीसाठी उद्योग, शिक्षण आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधण्याकरिता सरकार पाठबळ देत असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

सरकारने उद्योगाच्या विकासासाठी योग्य परिसंस्था निर्माण केली आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. वर्ष 2014 मध्ये केवळ 50 बायोटेक स्टार्टअप्स होते जे आज 6,000 झाले आहेत; अरोमा ऍग्रीटेक स्टार्टअप्समध्ये 3,000 तरुण आहेत, त्यापैकी क्वचितच कोणी पदवीधर आहे, परंतु त्यांच्याकडे अशी कौशल्ये आहेत जी त्यांचे वेगळेपण दर्शवतात.

जैवइंधन, जैव-रसायने यासह जैव अर्थव्यवस्था ‘वेस्ट टू वेल्थ’ अर्थात कचऱ्यातून संपत्ती तत्त्वावर आधारित चक्राकार अर्थव्यवस्थेचा चालक असल्याचे सिंह यांनी सांगितले. वर्ष 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

“आपल्याकडे भारतात प्रचंड जैव संसाधने आहेत, - हिमालयात, औषधी वनस्पती, अरोमा मिशन नवीन संधी निर्माण करत आहे, तर 7,500 किलोमीटरहून अधिक किनारपट्टीवर भारताच्या समुद्रातील प्रचंड संपत्तीचा वापर करण्यासाठी खोल महासागर अभियान सुरू करण्यात आले आहे,” असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943776)