पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान

Posted On: 27 JUL 2023 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2023

 

घरगुती गॅसच्या ग्राहकांना लागू होणाऱ्या दरामध्ये सरकार बदल करत असते. थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत लागू असलेले अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्याशिवाय 21 मे 2022 पासून अतिजास्त गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत(पीएमयूवाय) 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी 14.2 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी  एका वर्षात 12 रिफिल सिलेंडर पर्यंत प्रतिसिलेंडर 200 रुपयांचे अनुदान सरकार देत आहे.

वर्ष 2020-21 ते 2022-23 या कालवधीत सरासरी सौदी सीपी(एलपीजी दरांसाठी आंतरराष्ट्रीय मानक) प्रति मेट्रिक टन 415 डॉलरवरून प्रति मेट्रिक टन 712 डॉलरवर गेला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय दरांमधील वाढीचा प्रभाव भारतीय नागरिकांवर पूर्णपणे पडू देण्यात आला नाही ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना घरगुती एलपीजीच्या विक्रीवर रिकव्हरी अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपयांचा भार सहन करावा लागला. याची भरपाई  देण्यासाठी सरकारने 2022-23 या वर्षासाठी तेल कंपन्याना 22,000 कोटी रुपयांचा एका वेळचा भरपाईनिधी मंजूर केला. कोविड महामारीच्या काळात सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 2020 मध्ये पीएमयूवाय कुटुंबांना 14.17 कोटी मोफत एलपीजी रिफिल पुरवले.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1943400) Visitor Counter : 130


Read this release in: English , Urdu