वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ‘तांत्रिक वस्त्रासाठी मानके आणि नियमन’ विषयक सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
वैद्यकीय कापड, भूक्षेत्र-कापड, कृषी क्षेत्र कापड अशा क्षेत्रांसाठी चार नवी मानके, भारतीय मानक प्राधिकरणाकडून जारी
Posted On:
25 JUL 2023 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2023
वस्त्रोद्योग मंत्रालयाने, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (NTTM) अंतर्गत, फिक्की आणि भारतीय मानक ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने , “तांत्रिक वस्त्रासाठी मानके आणि नियमांवरील सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते, ज्यात भारतातील तांत्रिक वस्त्रांसाठी मानके, गुणवत्ता नियम आणि एच एस एन कोडचे सुसूत्रीकरण यावर भर देण्यात आला.
या परिषदेत, पाच तांत्रिक सत्रांचा समावेश होता ज्यात तांत्रिक वस्त्रांच्या विशेष क्षेत्रांतर्गत संरक्षणात्मक वस्त्रे, जिओटेक्स्टाइल म्हणजे भूक्षेत्र कापड, बिल्ड टेक, ओकोटेक, वैद्यकीय कापड आणि तांत्रिक वस्त्रांच्या इतर उदयोन्मुख क्षेत्रांसाठीची मानके आणि नियमांवर लक्ष केंद्रित केले गेले. एचएसएन कोड आणि मानकांचे सुसूत्रीकरण आणि QCO च्या अंमलबजावणीवर चर्चा करणारे विशेष सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने या परिषदेत चार नवीन मानके जारी केली - (i) IS 18266 : 2023, टेक्सटाइल्स - मेडिकल रेस्पिरेटर - स्पेसिफिकेशन, (ii) IS 18309 : 2023 जिओसिंथेटिक्स — प्रीफॅब्रिकेटेड वर्टिकल ड्रेन फॉर क्विक सॉलिडेशन ऑफ क्विक सॉलिफिकेशन — सॉफ्टीलाय 18 (Softily18) : 2023 टेक्सटाईल — फ्लोअर कव्हरिंग - लँडस्केपसाठी सिंथेटिक कापडापासून बनवलेले कृत्रिम गवताचे कार्पेट — स्पेसिफिकेशन आणि (iv) IS 18161 : 2023, कापड — 50 किलो मोहरी, नायजर बियाणे आणि नाचणी पॅकिंगसाठी हलक्या वजनाच्या तागाच्या पिशव्या.
केंद्रीय मंत्रालये, केंद्र आणि राज्य सरकारांचे विविध विभाग, अधिकारी आणि प्रतिनिधींसह 150 हून अधिक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते.
विविध संस्था, उद्योगप्रमुख, वैज्ञानिक तज्ञ, संशोधक आणि विविध श्रेणींमधील तांत्रिक वस्त्राशी संबंधित व्यावसायिक देखील या बैठकीत सहभागी झाले होते.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942618)
Visitor Counter : 156