अणुऊर्जा विभाग
स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची विजयी पताका
Posted On:
25 JUL 2023 8:01PM by PIB Mumbai
मुंबई, 25 जुलै 2023
स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे 16 जुलै ते 25 जुलै 2023 या कालावधीत झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत (आयसीएचओ) भारतीय विद्यार्थ्यांनी अत्युत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत जागतिक पातळीवर मोठी प्रशंसा आणि मान्यता मिळवली. या प्रतिष्ठित स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि तीन रौप्य पदकांची कमाई करत भारतीय संघाने उल्लेखनीय कौशल्याचा आविष्कार केला.
समग्र स्तरावर पदकतालिकेत सात इतर राष्ट्रांसह भारत 12व्या स्थानावर आहे.(पुष्टी होणे बाकी)चीन आणि सिंगापूर या देशांनी प्रत्येकी चार सुवर्णपदके मिळवली आहेत तर तैवान,इराण,व्हिएतनाम तसेच एक वैयक्तिक सहभागी (बहुधा रशियातील)यांनी प्रत्येकी 3 सुवर्णपदके तर जपान,अमेरिका,उजबेकिस्तान,आर्मेनिया आणि बल्गेरिया यांनी प्रत्येकी 2 सुवर्णपदके जिंकली. यावर्षी जगभरातील 87 देशातून आलेले 348 विद्यार्थी, आयसीएचओच्या झेंड्याखाली खेळणारे दोन संघ यांनी आयसीएचओ मध्ये उत्कृष्टतेचे दर्शन घडविण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला.
देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे विजेते भारतीय विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत:
- क्रिश श्रीवास्तव (नोईडा,उत्तर प्रदेश )- सुवर्णपदक
- अदिती सिंग (अहमदाबाद,गुजरात) - रौप्यपदक
- अवनीश बन्सल (मुंबई,महाराष्ट्र) – रौप्यपदक
- मलय केडिया (गाझियाबाद,उत्तर प्रदेश)- रौप्यपदक
स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारतीय संघ
भारतीय संघासोबत मुख्य मेंटॉर म्हणून प्रा.अनुपा कुंभार (एसपी. पुणे विद्यापीठ), मेंटॉर म्हणून प्रा.एन.मनोज (सीयुएसएटी, कोची), तसेच विज्ञान निरीक्षण म्हणून डॉ.श्रद्धा तिवारी (आयसीटी,मुंबई), प्रा.गुलशनआरा शेख (माजी प्राध्यापक, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई) हे स्पर्धेच्या वेळी उपस्थित होते.
गणित,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,जीवशास्त्र, खगोलशास्त्र तसेच खगोलभौतिकशास्त्र या विषयांतील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण यासाठी एचबीसीएसई हे नोडल केंद्र म्हणून काम करते. एचबीसीएसईतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी अंतिम संघ निवडीच्या दृष्टीने उपयुक्त असतात. राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षांची तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा : https://olympiads.hbcse.tifr.res.in
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942592)
Visitor Counter : 108