युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेळाचे महत्त्व प्रोत्साहनापासून निधीपर्यंत सर्वच बाबतीत वाढले आहे: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर

फिट इंडिया क्विझ 2022 च्या माध्यमातून देशभरातील शाळा आणि विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देणार

Posted On: 23 JUL 2023 9:23PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज (23 जुलै 2023) मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार केला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने विजेत्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या विजेत्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 72 शालेय विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फिट इंडिया क्विझ अंतर्गत शाळा आणि विद्यार्थ्यांना एकूण 3.25 कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि खेळांमध्ये सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. आपल्या दैनंदिन जीवनात खेळ आणि तंदुरुस्तीचे महत्त्व सांगून त्यांनी खेळ आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय योग्य संरचना असलेल्या परिसंस्थेची गरज अधोरेखित केली. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पालक, मुले आणि विशेषत: युवा वर्गाने क्रीडासंस्कृतीचा अंगिकार करण्यासाठी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

क्रीडा आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करत अनुराग सिंह ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेळाचे महत्त्व प्रोत्साहनापासून ते निधीपर्यंत सर्वच बाबींमध्ये उंचावले आहे यावर भर दिला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये असामान्य कामगिरीचे दर्शन घडवत देशाचा अभिमान वाढवला आहे. आगामी आशियाई खेळांमध्ये देशाच्या खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके जिंकावीत, अनेक विक्रम मोडीत काढावेत आणि देशाचा सन्मान मिळवून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तरुण पिढीतील आरोग्याच्या वाढत्या समस्यांवर अधोरेखित करताना, त्यांनी तंदुरुस्तीच्या व्यायामांसाठी दररोज काही वेळ देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि ते सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी योगाभ्यासाचे फायदे सांगून देशातील तरुणांना फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या फिट इंडिया क्विझचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. भारतातील 702 जिल्ह्यांतील 16,702 शाळांमधील 61,981 विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीला मोठा प्रतिसाद दिला. अंदमान आणि निकोबार, कारगिल, लक्षदीप, अरुणाचल प्रदेश आणि इतर अनेक भागांसह देशाच्या विविध भागातून विद्यार्थी यात सहभागी झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे, दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत उल्लेखनीय 70% वाढ झाली आहे, ज्यामुळे युवकांमध्ये खेळ आणि फिटनेसबद्दलची वाढती आवड आणि उत्साह दिसून येतो. दुसऱ्या आवृत्तीतही विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता, कारण  सर्व स्पर्धकांमध्ये त्यांचे प्रमाण 39% इतके होते.

या फेरीतील विजेते आता स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या फिट इंडिया क्विझच्या राष्ट्रीय फेरीत भाग घेतील. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील विजेत्या शाळेला पारितोषिकाची रक्कम एकूण 2.5 लाख रुपये, तर शाळेतील 2 विद्यार्थ्यांच्या संघाला एकूण 25,000 रुपये देण्यात आले. राज्यातील प्रथम उपविजेत्या शाळेला 1 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांना एकूण 10,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले. तसेच द्वितीय उपविजेत्या शाळेला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांना एकूण 5 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.

महाराष्ट्रामध्ये या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते आणि स्पर्धेच्या पाच फेऱ्या झाल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याणची बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल ही शाळा आणि त्यांचे अभिनव भोसेकर आणि अक्षय बियाणी हे विद्यार्थी विजेते ठरले.

फिट इंडिया क्विझ हा फिट इंडिया चळवळीचा एक भाग असून याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केली होती. भारताला एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. फिट इंडिया क्विझ 2022 ही शाळा आणि शालेय विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करणारी क्रीडा आणि तंदुरुस्तीशी संबंधित भारतातील सर्वात मोठी प्रश्नमंजुषा आहे.

गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी शाळांसाठी फिट इंडिया नॅशनल फिटनेस अँड स्पोर्ट्स क्विझच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली होती, त्यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, युवा व्यवहार, क्रीडा आणि गृह मंत्रालय राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते. या प्रश्नमंजुषेत भारताचा समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण यांच्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे.

The detailed list of winners can be found here.

S.NO.

STATE

NO. OF TEAMS

NO. OF ROUNDS

STATE/UT CHAMPION SCHOOL

NAME (STUDENT)

NAME (STUDENT)

1

ANDAMAN & NICOBAR

8

3

NAVY CHILDREN SCHOOL, SOUTH ANDAMAN

KAUSHAL CHAUDHARY

SAMBHAV SINGH PARMAR

2

ANDHRA PRADESH

16

5

LITTLE ANGELS SCHOOL, VISAKHAPATNAM

PSVV SAI TEJA

PALIPINI BHARATH KUMAR

3

ARUNACHAL PRADESH

8

3

KENDRIYA VIDYALAYA TENGA VALLEY, WEST KAMENG

KUSAL KUMAR SONAR

ADISAN VISHWAKARMA

4

ASSAM

8

3

KENDRIYA VIDYALAYA NO IV TEZPUR UNIVERSITY, SONITPUR

DARSHAN DIPAN BARUAH

RANGARAJ DEKA

5

BIHAR

8

3

KENDRIYA VIDYALAYA MOTIHARI, EAST CHAMPARAN

SAMMI JASSI

HIMANSHU KUMAR

6

CHANDIGARH

8

3

DELHI PUBLIC SCHOOL

JAGRIT SOOD

MUKUL HOODA

7

CHHATTISGARH

16

5

RUNGTA PUBLIC SCHOOL, DURG

AKSHIT AGRAWAL

ARCHIT KUMAR SINGH

8

DADRA & NAGAR HAVELI & DAMAN & DIU

8

3

ALOK PUBLIC SCHOOL, SILVASSA

DIVYANSH SHARMA

PRIYANK WADALKAR

9

DELHI

8

3

AMITY INTERNATIONAL SCHOOL, DELHI

BHAVYA GOAL

RASKRITI JAIN

10

GOA

8

3

VIDHYA VIHAR HIGH SCHOOL, CORTALIM, SOUTH GOA

ALVAN GAMA

TANVESH ULLO GAUDE

11

GUJARAT

16

5

S B R MAHESHWARI VIDYAPEETH, SURAT

PRATIK SINGH

HARSH BHAUWALA

12

HARYANA

8

3

BK SR. SEC. SCHOOL, BHIWANI

GARV

VAIBHAV

13

HIMACHAL PRADESH

16

5

AUCKLAND HOUSE SCHOOL FOR BOYS, SHIMLA

SAMARTH THAKUR

AADISH THAKUR

14

JAMMU & KASHMIR

16

5

GHSS RAJPURA, SAMBA

RANDEEP KUMAR SHARMA

THOHITH KUMAR

15

JHARKHAND

8

3

DAV PUBLIC SCHOOL, HAZARIBAGH

SHUBHAM KUMAR

SHREEMAN HARDIK

16

KARNATAKA

8

3

JAIN HERITAGE SCHOOL, BANGALORE URBAN

K VENKATARAMA SASTRY

VANDAN K JAIN

17

KERALA

8

3

ST THOMAS RESIDENTIAL SCHOOL, THIRUVANANTHAPURAM

HARI NARAYAN RAJMOHAN

NAKUL SYAM

18

LADAKH

8

3

GOVT MODEL HIGH SCHOOL LANKORE, KARGIL

ASSADULLAH MIR

MUNTAZIR MEHDI

19

LAKSHADWEEP

4

1

DRKK MOHAMMED KOYA GOVT SR. SEC. SCHOOL

MUHAMMED RAYEES

AYAAN MOHAMMED

20

MADHYA PRADESH

16

5

SHIVPURI PUBLIC SCHOOL, SHIVPURI

ANIRUDDH YADAV

DIVYANSH GALA

21

MAHARASHTRA

16

5

B. K. BIRLA PUBLIC SCHOOL KALYAN, THANE

ABHINAV BHOSEKAR

AKSHAY BIHANI

22

MANIPUR

4

1

TAZEI PUBLIC H. SEC. SCHOOL, NONEY

THAIREIMEI GOLMEI

DINGLEN RONGMEI

23

MEGHALAYA

8

3

NONGSTOIN COLLEGE H. SEC. SECTION, WEST KHASI HILLS

BANRAP WANNINAG

LAPYNSHNGAINPAT KHARBANI

24

MIZORAM

4

1

KENDRIYA VIDYALAYA MIZORAM UNIVERSITY, AIZAWL

SHLOK SINGH

PUSPANGSHU SARKAR

25

NAGALAND

4

1

ST MARYS H. SEC. SCHOOL, DIMAPUR

AJITESH KUMAR GUPTA

ABHAY KUMAR

26

ODISHA

8

3

DAV PUBLIC SCHOOL POKHARIPUT, KHORDHA

DHEEMAN MOHANTY

BHAVJIT PATTNAIK

27

PUDUCHERRY

4

1

AMALORPAVAM H. SEC. SCHOOL, PUDUCHERRY

PUVIARASU.V

BHARATH KUMAR.C

28

PUNJAB

8

3

KENDRIYA VIDYALAYA KAPURTHALA CANTT, KAPURTHALA

ARYANSH SHARMA

ARYAN PANDEY

29

RAJASTHAN

8

3

KENDRIYA VIDYALAYA NO I, JAIPUR

ISHITA AHLUWALIA

VEEDHISHA AHLUWALIA

30

SIKKIM

8

3

GOVERNMENT SR. SEC. SCHOOL SORENG, WEST SIKKIM

PRABAL CHETTRI

YADAV SHARMA

31

TAMIL NADU

8

3

MAHATMA MONTESSORI SCHOOL BABA CBSE, MADURAI

NAVANIT KESAV V

HARISH NIKIL P

32

TELANGANA

8

3

KENNEDY HIGH THE GLOBAL SCHOOL, HYDERABAD

MOHINI S

ADVAITH HARKARA

33

TRIPURA

8

3

SHISHU BIHAR H. SEC. SCHOOL, WEST TRIPURA

UTSAB DAS

ARPAN ROY

34

UTTAR PRADESH

32

11

SUNBEAM SCHOOL ANNAPURNA LAHARTARA, VARANASI

SHASHWAT MISHRA

ADITYA JAISWAL

35

UTTARAKHAND

8

3

SARAF PUBLIC SCHOOL, UDHAM SINGH NAGAR

ARNAV TIWARI

PRATYUSH PANDEY

36

WEST BENGAL

8

3

KENDRIYA VIDYALAYA NO 1 SALTLAKE

SHIBANSHU SOUBHAGYA DAS

HRITAM RONG

 

TOTAL

348

120

 

 

 

***

N.Meshram/S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941955) Visitor Counter : 201


Read this release in: English