निती आयोग
azadi ka amrit mahotsav

नीती आयोगाने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसरा ‘निर्यातविषयक सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2022’ केला जारी

Posted On: 17 JUL 2023 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2023

 

नीती आयोगाने आज राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसरा ‘निर्यातविषयक सज्जता निर्देशांक (ईपीआय) 2022’ अहवाल जारी केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते हा अहवाल जारी करण्यात आला.

ईपीआय 2022 सांगतो की प्रादेशिक स्पर्धात्मकतेला मुक्त करून तसेच आपल्या अंतर्गत वैविध्याचा वापर करून भारत त्याची निर्यात क्षमता वाढवू शकतो.नीती आयोगाने स्पर्धात्मकता संस्थेच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेला निर्यातविषयक सज्जता निर्देशांक राज्य पातळीच्या पलीकडे पोहोचून जिल्हा पातळीवरील निर्यातीची तपासणी करतो.

ईपीआय 2022 अहवाल राज्य सरकारांना निर्णय प्रक्रियेत मदत करणे, ताकदीची क्षेत्रे ओळखणे, कमकुवतपणा दूर करणे आणि देशाच्या राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यापक विकासाची जोपासना करणे यांसाठी प्रदेश विशिष्ट विचारांनी सक्षम करण्याची सूचना करतो.

राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील निर्यातविषयक तयारीचे तुलनात्मक विश्लेषण देशातील स्पर्धात्मकतेची जोपासना करणाऱ्या आराखड्याची सुरुवात करून देते.  हा निर्देशांक भागधारकांना धोरणे निश्चित करण्याची क्षमता देतो आणि राज्यांच्या निर्यातीवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमाणकांमध्ये सुधारणा करतो आणि त्यायोगे त्या राज्याच्या निर्यातविषयक स्पर्धात्मकतेमध्ये वाढ करतो. हा निर्देशांक, माहिती आधारित दृष्टीकोनासह धोरणात्मक बदलासाठी तसेच अनुकूल निर्यात परिसंस्थेसाठी व्यापक विश्लेषण पुरवतो. परिणामी, प्रत्येक राज्याची निर्यातविषयक कामगिरी उंचावून आणि देशाच्या समग्र विकासात योगदान देऊन हा भाग, स्पर्धात्मक संघराज्यवादासाठी प्रेरक म्हणून कार्य करतो.

हा अहवाल आर्थिक वर्ष 22 मधील भारताच्या निर्यात कामगिरीचे क्षेत्र-निहाय आणि जिल्हा-स्तरीय व्यापारी माल निर्यात कलासह सर्वसमावेशक विश्लेषण सादर करतो. ईपीआय 2022 अहवाल चार स्तंभांमध्ये राज्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करतो – धोरण, व्यवसाय परिसंस्था, निर्यात परिसंस्था आणि निर्यात कामगिरी. निर्देशांक हा 56 निर्देशकांचा वापर करतो जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निर्यातीची सज्जता राज्य आणि जिल्हा स्तरावर निर्यात करण्याच्या दृष्टीने समग्रपणे दर्शवतात. 

ईपीआय 2022 च्या अहवालात असे आढळून आले आहे की, बहुतांश ‘किनारी प्रदेशातील राज्यांनी चांगली कामगिरी केली असून, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ही राज्ये राज्यांच्या सर्व श्रेणींमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात अव्वल स्थानावर आहेत.

हा अहवाल राज्य सरकारांना निर्यातीवरील त्यांच्या संदर्भ-निहाय आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो.

अहवालाचा उद्देश देशातील स्पर्धात्मक संघीयवाद सुलभ करणे हा आहे ज्यामुळे राज्यांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना निर्माण होते आणि राज्यांमध्ये समतुल्य -शिक्षणाला प्रोत्साहन मिळते.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी यांनी अहवालाचे प्रकाशन करताना सांगितले की, “आपण 2047 कडे पाहत असताना आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असताना, उत्पादनासोबत सेवा आणि कृषी निर्यातीत स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे.

EPI 2022 Overall Rankings

Rank

State

Category

Score

1

Tamil Nadu

Coastal

80.89

2

Maharashtra

Coastal

78.20

3

Karnataka

Coastal

76.36

4

Gujarat

Coastal

73.22

5

Haryana

Landlocked

63.65

6

Telangana

Landlocked

61.36

7

Uttar Pradesh

Landlocked

61.23

8

Andhra Pradesh

Coastal

59.27

9

Uttarakhand

Himalayan

59.13

10

Punjab

Landlocked

58.95

11

Odisha

Coastal

58.84

12

Madhya Pradesh

Landlocked

55.68

13

Rajasthan

Landlocked

54.80

14

West Bengal

Coastal

53.57

15

Himachal Pradesh

Himalayan

52.25

16

Goa

UT/Small States

51.58

17

Jammu and Kashmir

UT/Small States

47.79

18

Delhi

UT/Small States

47.69

19

Kerala

Coastal

44.03

20

Jharkhand

Landlocked

43.91

21

Assam

Landlocked

43.19

22

Bihar

Landlocked

41.06

23

Manipur

Himalayan

40.77

24

Andaman & Nicobar Islands

UT/Small States

40.65

25

Chhattisgarh

Landlocked

39.10

26

Tripura

Himalayan

38.30

27

Sikkim

Himalayan

36.86

28

Nagaland

Himalayan

34.63

29

Ladakh

UT/Small States

31.51

30

Chandigarh

UT/Small States

31.27

31

Puducherry

UT/Small States

24.34

32

Meghalaya

Himalayan

24.24

33

Arunachal Pradesh

Himalayan

19.92

34

Dadra Nagar and Haveli & Daman and Diu

UT/Small States

18.74

35

Mizoram

Himalayan

16.96

36

Lakshadweep

UT/Small States

11.30

  

* * *

N.Chitale/Sanjana/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1940329) Visitor Counter : 601


Read this release in: English , Urdu , Hindi