आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात आयुष आरोग्य सेवांचे उद्घाटन

Posted On: 13 JUL 2023 4:16PM by PIB Mumbai

पणजी, 13 जुलै 2023

केंद्रीय आयुष मंत्रालयाने गोव्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि संशोधन सुविधा स्थापन केली आहे. ही सुविधा रायबंदर येथील जुन्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुरु करण्यात आली आहे. या नवीन सुविधेचे उद्घाटन 14 जुलै 2023 रोजी केंद्रीय आयुष मंत्री आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह गोवा सरकार आणि आयुष मंत्रालयाचे अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

ही संयुक्त आरोग्य-सेवा आणि संशोधन सुविधा केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत संशोधन परिषदांनी स्थापन केली आहे. यात केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद - खनिज आणि सागरी औषधी संसाधनांसाठी प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, होमिओपॅथीमधील संशोधन परिषद - क्लिनिकल संशोधन. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्ध - सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन - युनानी स्पेशॅलिटी या संस्थांचा समावेश आहे. आयुष औषधाच्या पारंपारिक प्रणालींद्वारे गोव्यात उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करणे हे या सुविधेचे उद्दिष्ट आहे. यात बाह्यरुग्ण विभाग (OPD), एक दवाखाना आणि पंचकर्म केंद्र अशी व्यवस्था आहे, जी सर्वांसाठी उपलब्ध असेल.

पारंपारिक औषध प्रणालींमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी, एक संग्रहालय आणि ग्रंथालय आणि खनिज आणि सागरी उत्पत्तीच्या औषधांवर संशोधन करण्यासाठी समर्पित प्रयोगशाळा विकसित केली जात आहे. ही संसाधने ज्ञानाचे मौल्यवान भांडार म्हणून काम करतील आणि संशोधक, अभ्यासक आणि लोकांमध्ये माहितीची देवाणघेवाण सुलभ करतील.

या सुविधेची सुरुवात आयुष क्षेत्रातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधनांचा विस्तार करण्याच्या आयुष मंत्रालयाच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करते. पारंपारिक वैद्यकीय प्रणालींमधील संशोधनाला चालना देण्यासाठी समान उद्दिष्टे सामायिक करणार्‍या नामांकित संस्थांसोबत प्रभावी सहकार्य वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे. आयुष सेवांना आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडण्यासाठी आणि क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही सुविधा कार्य करेल.

SRT/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1939203) अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein: English