कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते श्रीनगर येथे केंद्रीय संचार ब्युरोच्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2023 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज श्रीनगर येथे केंद्रीय संचार ब्युरोच्या (CBC) च्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नऊ वर्षे याबद्दल विशेष माहिती देणारे हे पाच दिवसीय प्रदर्शन एस .पी मॉडेल उच्च माध्यमिक विद्यालय येथे 14 जुलै 2023 पर्यंत सुरु असेल.
2014 पूर्वी भारताची भ्रष्टाचारासाठी ख्याती होती, त्याचा अत्यंत हानिकारक प्रभाव लोकांवर, विशेषतः युवावर्गावर पडत असे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी एक परिवर्तनात्मक प्रतिमा म्हणून उदयाला आले, त्यांनी यशस्वीपणे या निराशेचे रूपांतर आशावादात केले आणि राष्ट्रांच्या समुदायामध्ये भारताला एक उज्ज्वल उदाहरण म्हणून स्थान मिळवून दिले.

शैक्षणिक संस्थेत हे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल केंद्रीय संचार ब्यूरोचे अभिनंदन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की पूर्वी, आपल्याला असे वाटायचे की आपण आपल्या तरुणाईला अयशस्वी केले आहे, मात्र पंतप्रधानांनी सुरु केलेल्या उपक्रमांमुळे नवनवीन स्टार्ट अप्स उदयाला आल्यामुळे आता देशातील तरुणांना उज्ज्वल भविष्य मिळू शकेल.
केंद्रीय संचार ब्युरोद्वारे आयोजित 5 दिवसांचा एकात्मिक संवाद आणि आउटरीच कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक सेवा, सुशासन आणि वंचितांचे कल्याण या क्षेत्रांमध्ये गेल्या 9 वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1938536)
आगंतुक पटल : 151