वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती अंतर्गत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग गटाकडून(एनपीजी) आपल्या 51 व्या बैठकीत रस्तेमार्गाने दळणवळणाच्या पाच प्रकल्पांची शिफारस


आतापर्यंत एनपीजीच्या 51 बैठकांतर्गत 5.39 लाख कोटी रुपये खर्चाच्या 85 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन

Posted On: 07 JUL 2023 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2023 

 

पीएम गतिशक्ती अंतर्गत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या अतिशय महत्त्वाच्या 51 व्या बैठकीचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (DPIIT) सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) विशेष सचिव(लॉजिस्टिक्स) सुमिता दावरा या देखील उपस्थित होत्या. या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 15,683 कोटी रुपये खर्चाच्या पाच प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. 

या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातले दोन, मिझोराममधील एक , उत्तराखंडमधील एक आणि कानपूरमधील एका प्रकल्पाचा समावेश असून त्यांच्या मदतीने मालवाहतुकीचे योग्य नियोजन करून आणि शहरांमधील वाहतूककोंडी दूर करून औद्योगिक समूह आणि सामाजिक क्षेत्रातील मालमत्तासोबतच्या कनेक्टिविटीमध्ये सुधारणा होण्याची आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. 

आर्थिक केंद्रे, धार्मिक आणि पर्यटन स्थळे, औद्योगिक समूह, संरक्षण मालमत्ता यांच्या कनेक्टिविटीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रामधील क्षमतावृद्धी करणाऱ्या दोन प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. नाशिक फाटा ते खेड यांना जोडणारा आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग या दोन्ही प्रकल्पांचे एनएमपी पोर्टलचा वापर करून पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यातील 10 प्रमुख सिद्धांतांवर भर देत नियोजन करण्यात आले आहे. एकात्मिक पायाभूत सुविधा विकास आणि सुधारित वापर जाळे यांच्यासह 10 आर्थिक केंद्रे आणि 12 सामाजिक केंद्रांसोबतची कनेक्टिविटी सुधारण्यासाठी या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे एनएमपी पोर्टलवर मंजुरी प्रक्रियांची / मंजुरीसाठीच्या गरजा विचारात घेऊन त्यांच्या माध्यमातून भूसंपादन आणि इतर मंजुऱ्यांची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू आहे.

51व्या एनपीजी बैठकीमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, बंदरे आणि नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, दूरसंचार विभाग, नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि नीती आयोगातील एनपीजी सदस्य संबंधित राज्यांच्या प्रतिनिधींसह सहभागी झाले होते.       

 

* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938060) Visitor Counter : 120


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi