विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलन (आरआयआयजी) प्रतिनिधींचा आयआयटी मुंबई इथे अभ्यास दौरा

Posted On: 06 JUL 2023 8:34PM by PIB Mumbai

मुंबई, 6 जुलै 2023

जी-20 संशोधन मंत्र्यांच्या बैठकीच्या (आरएमएम) कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून, संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलनाच्या (आरआयआयजी) प्रतिनिधींनी आज म्हणजे 6 जुलै 2023 रोजी आयआयटी मुंबईचा अभ्यास दौरा केला.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. एस. सुदर्शन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (डीएसटी) डॉ. श्रीवरी चंद्रशेखर यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. प्रा. एस. सुदर्शन यांनी आयआयटीच्या कार्याचे सादरीकरण केले. प्रा. उपेंद्र भांडारकर यांनी संशोधन आणि विकास व्यवस्थेबद्दल आणि प्रा. असीम तिवारी यांनी आयआयटी मुंबईतील  उद्योजकता आणि नवोन्मेषपूरक वातावरणाची माहिती दिली. तसेच या सगळ्यांनी नंतर, प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांना संस्थेतील संशोधन, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान उष्मायन आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती देण्यात आली.

आयआयटी मुंबईचे विविध विभाग आणि केंद्रांनी विकसित केलेल्या अभिनव संशोधन आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या विविध प्रदर्शन स्टॉललाही प्रतिनिधींनी  भेट दिली.

 

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 1937849) Visitor Counter : 185
Read this release in: English , Urdu , Hindi