नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई विमानतळाच्या क्षमतेत वाढ - T2 येथे सुरक्षा तपासणी क्षेत्राचा विस्तार


एकात्मिक प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक (पीईएससी) क्षमतेत लक्षणीय वाढ

प्रविष्टि तिथि: 05 JUL 2023 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या T2 टर्मिनलवर सिक्युरिटी चेकपॉईंट एरिया (एससीपी) अर्थात सुरक्षा तपासणी क्षेत्राच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 चा विस्तार आणि आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे ज्यामुळे क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे, परिणामी प्रतीक्षा कालावधी कमी होऊन प्रवाशांच्या सोयीसुविधेत वाढ झाली आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री, ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ला 3 टप्प्यांमध्ये विस्तार आणि अद्ययावतीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते ज्यात पहिला टप्पा हा 31 मार्च 2023 रोजी आणि दुसरा टप्पा 2 हा 30 जून 2023 रोजी पूर्ण झाला आहे. यामुळे टर्मिनलची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा निर्माण झाली आहे, ज्याद्वारे प्रवाशांची सुलभता वाढून गर्दी कमी होण्यास मदत सुनिश्चित होईल.

जागतिक कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी  भारतीय विमान वाहतूक क्षेत्राने केलेल्या सुधारणा  आणि लवचिकतेच्या अनुषंगाने, देशाने दैनंदिन प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ अनुभवली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे एक आकांक्षी भारत तयार झाला आहे जो उड्डाण करण्यास इच्छुक आणि सज्ज आहे. या मागणीला प्रतिसाद म्हणून, एमआयएएल ने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि बीसीएएस यांच्याशी सल्लामसलत करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) च्या टर्मिनल 2 वर प्रवाशांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्याकरिता क्षमता वाढवण्यासाठी आणि अशा प्रकारच्या पहिल्या एकात्मिक एससीपी सुविधा अद्ययावत करण्यासाठी एक व्यापक योजना आखली आहे. प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी, प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अखंड परंतु सुरक्षित प्रवास अनुभव देण्यासाठी या धोरणात्मक उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. या कामाचा पहिला टप्पा सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाला आणि तीनपैकी दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि अपेक्षित परिणाम दिसण्यास सुरुवात झाली.

अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी, सीएसएमआयए ने प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक  तैनात केले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुले/बालकांसह प्रवास करणारे आणि विशेषत: दिव्यांग प्रवाशांसाठी प्राधान्य मार्ग प्रदान केले आहेत.

एमआयएएल ने केलेल्या प्रगतीवर भाष्य करताना, नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री, ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले, प्रवाशांचे समाधान हे नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे आणि मला आनंद होत आहे की खाजगी विमानतळ ऑपरेटर सर्वांना विमान प्रवास सुलभ करण्यासाठी आमच्या आदेशात पूर्णपणे सहकार्य करत आहेत. एमआयएएल ने ही अतिरिक्त जागा निर्माण करून उत्तम काम केले आहे ज्यामुळे क्षमता वाढेल आणि प्रवाशांना सुविधा मिळेल. या प्रकल्पाचा टप्पा 3 पूर्ण झाल्याने यात आणखी वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू आणि नागरिकांना सर्वोत्तम सेवा देऊ.

Before: Demolition of F&B and Retail

After : Additional Queuing Space

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1937637) आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी