निती आयोग

जागतिक स्टार्टअप परिसंस्थेसंदर्भात स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाच्या गुरुग्राम शिखर परिषदेत गाठणार पहिला महत्वपूर्ण टप्पा

Posted On: 03 JUL 2023 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2023 

 

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाने आयोजित केलेल्या स्टार्टअप 20 शिखर परिषदेला आजपासून गुरुग्राम येथे सुरुवात झाली. स्टार्टअप 20च्या उद्घाटन वर्षाची सफल परिपूर्ती आणि अंतिम धोरण अभिपत्रक (धोरणाचा मसूदा)   प्रकाशनाचा उत्सव साजरा करणारा हा दोन दिवसांचा कार्यक्रम महत्त्वपूर्ण यश अधोरेखित  करणारा आहे.

दोन दिवसांचा हा  कार्यक्रम म्हणजे, स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाने गाठलेला पहिला मोठा, महत्वपूर्ण  टप्पा म्हणता येणार आहे.

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत आणि स्टार्टअप 20चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव यांच्यासह प्रमुख मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, यांनी परिषदेसाठी आपण अतिशय उत्सुक असल्याचे मनोगत व्यक्त केले आणि भरभराटीला येत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासात परिषदेची भूमिका अधोरेखित केली. "स्टार्टअप 20 गुरुग्राम शिखर परिषद, स्टार्टअपसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि नवोन्मेषी उद्योजकतेमध्ये जागतिक नेता म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे."असे त्यांनी सांगितले. 

भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांनी  स्टार्टअप 20 चे महत्त्व विषद केले. "स्टार्टअप20 प्रतिबद्धता गट हा जागतिक स्टार्टअप परिसंस्थेच्या प्रवासात एक मैलाचा दगड आहे. जी 20 देशातील आणि आमंत्रित देशांमधले प्रतिष्ठित प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या या गटाने आपल्याकडील ज्ञान, शहाणपण यांचा वापर सामूहिक कामासाठी केला त्याचबरोबर केलेले  अथक प्रयत्न,  यामुळे अंतिम धोरण अभिपत्रक आकाराला येऊ शकले. ते  एकत्रितपणे काम करणाऱ्या देशांमध्ये आपल्या सर्वसमावेशक स्टार्टअप परिसंस्थेसह आपल्या नागरिकांसाठी प्रगत भविष्य आणि परिवर्तनकारी पाया रचणारे आहे. आगामी काळात अध्यक्षपद  भूषवणाऱ्या सर्व देशांकडून दृढ प्रतिबद्धतेत हा गट निरंतर सातत्य राखेल असा विश्वास मला वाटतो.''

"स्टार्टअप 20 शिखर परिषद स्टार्टअप कार्यक्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात करते, असे सांगत स्टार्टअप 20 चे अध्यक्ष डॉ चिंतन वैष्णव यांनी शिखर परिषदेच्या  प्रभावाबद्दल त्यांनी उत्साहाने मनोगत व्यक्त केले. गुरुग्राममध्ये जमलेल्या 22 देशांतील 600 हून अधिक प्रतिनिधींच्या सहभागासह, आपण अनेक महिन्यांचे सहकार्य, सल्लामसलत आणि  दृढनिर्धाराच्या साहाय्याने गाठलेला स्टार्टअप 20 प्रवासाचा पहिला मोठा यशस्वी टप्पा साजरा करत आहोत. आपण एकत्रितपणे, आपण  स्टार्टअप कार्यक्षेत्राच्या  समृद्धीचा  आणि शाश्वत भविष्याच्या दिशने   एक मार्ग तयार करू असे त्यांनी सांगितले.

2024 मध्ये स्टार्टअप20 प्रतिबद्धता गटामध्ये आपला सहभाग कायम ठेवण्याचा ब्राझीलचा निर्णय या उपक्रमाचे जागतिक महत्त्व आणखी बळकट करतो. ब्राझील आणि इतर सर्व देशांची निरंतर वचनबद्धता त्यांच्या नवोन्मेषला चालना देण्यासाठी आणि जागतिक स्टार्टअप कार्यक्षेत्राला  पाठबळ  देण्याच्या त्यांच्या समर्पणाचे उदाहरण देते, असे ते म्हणाले.

स्टार्टअप20 गुरुग्राम परिषदेमध्ये  उत्साहपूर्ण चर्चा, ज्ञानवर्धक सादरीकरणे आणि मौल्यवान नेटवर्किंग संधींचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण आणि आकर्षक कार्यक्रम आहे. प्रतिनिधींना उद्योगातील तज्ञ, धोरणकर्ते आणि विचारवंतांशी संपर्क साधण्याची , धोरणात्मक आघाडीला चालना देण्याची   आणि जागतिक स्तरावर स्टार्टअप्सच्या मार्गक्रमणला आकार देण्याची विशेष संधी प्राप्त होणार आहे.

स्टार्टअप कॉन्क्लेव्ह हा शिखर परिषदेचा एक अंतर्गत भाग आहे, यात स्टार्टअप्स त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करतील तसेच गुंतवणूकदारांसाठी पोषक  वातावरण  ,मार्गदर्शन सत्र आणि उद्योग व्यावसायिकांसह  संदर्भात चर्चा करतील. या कार्यक्रमामध्ये  कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील समावेश  आहेत, हा सर्व सहभागींसाठी एक समृद्ध अनुभव असेल.

आर्थिक समृद्धी  आणि सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी स्टार्टअप्सची प्रचंड क्षमता ही परिषद अधोरेखित करते. नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देणार्‍या वातावरणाला प्रोत्साहन देऊन, स्टार्टअप्सची पूर्ण क्षमता, आर्थिक वृद्धी, रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे , स्टार्टअप 20 गुरुग्राम परिषदेचे उद्दिष्ट आहे.

अंतिम धोरण प्रसिद्धीपत्रक  https://www.startup20india2023.org/ येथे उपलब्ध आहे आणि डाउनलोड करता येईल.

 

* * *

S.Bedekar/S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1937028) Visitor Counter : 155