अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर येथे साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे 21 जून हा दिवस आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आहे : भागवत कराड
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2023 4:18PM by PIB Mumbai
छत्रपती संभाजी नगर, 21 जून 2023
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला, केंद्रीय वित्तराज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्र आणि आयुर्विमा महामंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. भागवत कराड यांनी कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना दैनंदिन आयुष्यातील योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच, संयुक्त राष्ट्रांनी 2014 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जात आहे, असे कराड यांनी सांगितले.

राज्याचे सहकार मंत्री, अतुल सावे, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, , अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, शिक्षण विभागाचे उपसंचालक अनिल साबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक महेश डांगे, एलआयसी ऑफ इंडिया चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक संजय रामधर्णे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, मंगेश केदार यांच्यासह इतर सर्व बँक अधिकारी, योग शिक्षक, शाळा विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान "छत्रपती संभाजीनगर योग संस्थेच्या" विद्यार्थ्यांनी मेळाव्यासमोर योगासने केली. योग शिक्षक डॉ.उत्तम कळवणे, इतर शिक्षकांसह सुरेश मिरकर आणि श्रीमती ताकसांडे यांनीही यावेळी योगाचे प्रात्यक्षिक केले.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934072)
आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English