शिक्षण मंत्रालय
पुण्यात जी-20 शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीपूर्वीचा कार्यक्रम म्हणून, “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
“मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, ‘मिश्र स्वरूपात शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित
निष्ठा अंतर्गत 35 लाख पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरील शिक्षकांना प्रशिक्षण; शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य सुधारण्यावर भर
महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांचे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख’ या वरील पद्धतींविषयीचे प्रभावी सादरीकरण
Posted On:
18 JUN 2023 4:28PM by PIB Mumbai
: पुणे, 18 जून,2023
पुण्यात आज “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, शिक्षणक्षेत्राविषयी आणखी काही कार्यक्रम झाले. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने आयोजित ह्या कार्यक्रमात, ‘मिश्र स्वरूपात शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण” या विषयावर चर्चा झाली.

शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक सुरेश गोसावी, केंद्रीय आणि राज्यातील शिक्षण मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी, निष्ठा (NISHTHA)म्हणजेच – मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या राष्ट्रीय उपक्रमाविषयी बोलतांना, शिक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव लामचोंघोई स्वीटी चांगसन यांनी सांगितले की, 2019 साली, सुरु झालेल्या ह्या उपक्रमाचा नंतर 2021-22 मध्ये माध्यमिक शिक्षणापर्यंत विस्तार करण्यात आला. आणि त्याला “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” स्वरूप देण्यात आले. या अंतर्गत, आतापर्यंत, 35 लाख पूर्व प्राथमिक,प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात, शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोनातून शिक्षण पद्धती बळकट करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या मूलभूत टप्प्यासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा (एनसीएफ ) देखील त्यांनी उल्लेख केला. एक पद्धतशीर सामान्य पाया प्रदान करणे आणि देशभरात प्रमाणित, श्रेणी निहाय शिक्षण साध्य करणे हे या आराखड्याचे उद्दिष्ट आहे.
शिकण्याचा अनुभव , परिणामकारकता आणि शिक्षणाची पोहोच वाढवण्यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे पारंपरिक दृष्टिकोन आणि ऑनलाइन शिक्षणाचा मेळ घालणारी मिश्र शिक्षण पद्धती अधोरेखित केली. मिश्र शिक्षण पद्धती कायम राहण्यासंदर्भात बोलताना, मिश्र शिक्षण पद्धती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी,बदलांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी कौशल्ये, ज्ञान आणि अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोनांसह सुसज्ज असणे आवश्यक आहे , असे त्यांनी सांगितले.
प्रा. सुरेश गोसावी यांनी सध्या आयोजित मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाबद्दल माहिती दिली. या प्रदर्शनामध्ये जी 20 देश, भारतीय राज्ये, कंपन्या , आंतरराष्ट्रीय संस्था, स्वायत्त संस्था आणि नागरी संस्था यांनी त्यांची कामगिरी प्रदर्शित केली आहे. हे प्रदर्शनात काही सर्वोत्तम पद्धती मांडण्यात आल्या असून या प्रदर्शनात संबंधितांकडून मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठीच्या कामगिरीचे दर्शन घडत आहे.,यावर त्यांनी भर दिला. कोणत्याही समस्येचे निराकरण कधीही वेगळे राहून स्वतंत्रपणे केले जाऊ शकत नाही त्यामुळे असे मंच आपल्याला सामूहिक विकासाची संधी देतात, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आपापल्या राज्यांच्या मूलभूत साक्षरता आणि संख्याशाश्त्र पद्धतींचे प्रभावी सादरीकरण केले.
शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव अर्चना शर्मा अवस्थी, यांनी आभार मानले आणि आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
***
S.Kane/R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933269)