ऊर्जा मंत्रालय
चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट उद्योग विभागात बरौनीचे राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ अव्वल
Posted On:
17 JUN 2023 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2023
चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट उद्योग विभागात बरौनीच्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने अव्वल स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाला हा पुरस्कार देत भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने, त्यांनी जल स्रोतांचे संवर्धन आणि व्यवस्थापनासंदर्भात केलेल्या विशेष प्रयत्नांचे महत्व अधोरेखित केले.

राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने पर्यावरण जतनासाठी सातत्याने शाश्वत आणि समर्पित प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या य़शात या प्रयत्नांचा फार मोठा वाटा आहे. जल स्रोतांचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या महामंडळाने राबवले आहेत.
आज, 17 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत, राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग आणि बरौनीच्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाचे प्रकल्प प्रमुख राजीव खन्ना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* * *
M.Pange/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933095)
Visitor Counter : 174