अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीआयसीने नॅशनल टाइम रिलीज स्टडी (NTRS) 2023 अहवाल केला प्रसिद्ध

Posted On: 15 JUN 2023 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2023

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (सीबीआयसी ) अध्यक्ष विवेक जोहरी आणि मंडळाच्या इतर सदस्यांनी नॅशनल टाइम रिलीज स्टडी (NTRS) 2023 अहवाल (राष्ट्रीय वेळ सारणी अभ्यास  2023 अहवाल) जारी केला.

टाईम रिलीज स्टडी (TRS) हे किती वेळेत किती मालाची ने-आण झाली ते मोजण्याचे साधन आहे. आयात आणि आगमनाच्या बाबतीत देशांतर्गत मंजुरीसाठी सीमाशुल्क केंद्रावर  माल पोहोचल्यापासून ते  निर्यातीच्या बाबतीत सीमाशुल्क केंद्रावरील मालवाहू वाहकाच्या अंतिम निर्गमनापर्यंतचा वेळ मोजला जातो.

NTRS 2023 मधे चालू वर्षासाठी, 1-7 जानेवारी 2023 (दोन्ही दिवस समाविष्ट) च्या नमुना कालावधीवर आधारित बंदर-श्रेणीनुसार सरासरी सारणी कालावधी सादर केला आहे. तसेच 2021 आणि 2022 च्या संबंधित कालावधीतील कामगिरीची तुलना केली आहे.

अ.राष्ट्रीय व्यापार सुविधा कृती आराखड्याच्या उद्दिष्टांच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे मूल्यांकन करणे;

ब.विविध व्यापार सुलभ उपक्रमांचा प्रभाव , विशेषत: तत्परतेचा मार्ग जाणून घेणे आणि

क.सारणी वेळेत अधिक जलद कपात करण्यासाठी आव्हाने ओळखणे. यांचा यात समावेश आहे.

या अभ्यासात समाविष्ट असलेली बंदरे देशातील सुमारे 80 आयात आणि 70 टक्के निर्यातीसाठी उत्तरदायी असलेली बंदरे, एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACCs), अंतर्देशीय कंटेनर डेपो (ICDs) आणि एकात्मिक चेक पोस्ट्स (ICPs) यांचे प्रतिनिधित्व करतात.

नियामक मंजुरी स्वीकारून, जवळपास सर्व बंदर श्रेणींसाठी NTFAP सारणी वेळेचे लक्ष्य गाठले गेले आहे.  सुधारित सरासरी सारणी वेळेबाबत निश्चिततेची मर्यादा सुधारली आहे असे दिसून आले आहे.

नॅशनल टाइम रिलीज स्टडी 2023 चे संपूर्ण निष्कर्ष CBIC च्या संकेतस्थळावर ( https://www.cbic.gov.in/ ) पाहता येतील.

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1932634) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi