मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मच्छिमारांची उन्नती करणे आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हे या भेटीचे मुख्य ध्येय :  परशोत्तम रुपाला

Posted On: 10 JUN 2023 8:01PM by PIB Mumbai

 

केरळला 590 किमी. चा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. देशातील मत्स्य उत्पादनात त्याचा मोठा वाटा आहे. सागरी मत्स्य व्यवसायाव्यतिरिक्त हे राज्य अंतर्देशीय मासेमारीसाठी देखील लोकप्रिय आहे. 8 जून 2023 पासून केरळच्या मडक्कारा येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेच्या सातव्या टप्प्यात ही यात्रा पल्लिकारा, बेकल, कन्हानगाडू, कासारगोडे मार्गे 9 जून 2023 रोजी माहे (पुडुचेरी), कोझिकोडे जिल्ह्याहून केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आज पोहोचली. येथून ही यात्रा पुढे कोचीन आणि त्रिवेंद्रम मार्गे केरळच्या संपूर्ण किनारपट्टीला भेट देणार आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, केरळचे मत्स्यव्यवसाय मंत्री साजी चेरियन, मत्स्यव्यवसाय विभागाचे विशेष कार्य अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अभिलाक्ष लेखी, आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्रिशूरमधील नट्टिका गावातील एस .एन.  सभागृहाला भेट दिली आणि या यात्रेचे स्वागत केले.

परशोत्तम रुपाला यांनी यावेळी सांगितले की मच्छिमारांची उन्नती करणे आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हे या दौऱ्याचे मुख्य ध्येय आहे. तसेच मासेमारी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर भागधारकांच्या समस्या समजून घेणे हा देखील किनारपट्टीवरील राज्यांच्या भेटीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आले. या उपक्रमांतर्गत लाभार्थी मच्छिमार, महिला मच्छीमार, मत्स्यपालक आणि किनारी भागातील लोकप्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधला.

परशोत्तम रुपाला, यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत त्यांच्या समस्या आणि विकासाच्या संधींबद्दल चर्चा केली. मत्स्यपालन परिसंस्था सक्षम करण्यासाठी लाभार्थ्यांकडून विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हा उपक्रम राबविल्याने भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील, असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञान आणि मासेमारी तसेच मत्स्यपालनाच्या वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून माशांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931398)
Read this release in: English , Urdu , Hindi