कंपनी व्यवहार मंत्रालय

शैक्षणिक आणि संशोधन सहकार्यासाठी आयआयसीए आणि आरआरयू यांच्यामध्‍ये सामंजस्य करार

Posted On: 09 JUN 2023 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2023

 

आयआयसीए म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स  आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आआरयू) यांच्यामध्‍ये  आज येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

अंतर्गत सुरक्षा, आर्थिक गुन्हे, कायद्याची अंमलबजावणी, कॉर्पोरेट फसवणूक आणि या संलग्न  असलेल्या इतर विषयांच्या क्षेत्रात क्षमता निर्माण, शिक्षण, संशोधन तसेच  सल्लामसलत करण्यासाठी आयआयसीए आणि आरआरयू यांच्यामध्‍ये सामंजस्य करार झाला आहे. व्यावसायिक क्षमतांमध्‍ये  समन्वय साधण्याचा  हेतू यामागे आहे. या करारानुसार उभय संस्था  संशोधन, प्रशिक्षण कार्यक्रम   आयोजित करण्यासाठी  आणि  ज्ञान आणि संसाधनांची देवाणघेवाण करणार आहेत.

आयआयसीएचे महासंचालक आणि मुख्‍य काय्रकारी अधिकारी   प्रवीण कुमार यांनी यावेळी दूरदृश्‍य प्रणालीव्दारे मार्गदर्शन करताना  सांगितले की, “कॉर्पोरेट फसवणूक हा सर्वात गंभीर आर्थिक गुन्ह्यांपैकी एक आहे कारण त्यात प्रचंड प्रमाणावर  सार्वजनिक निधी  गुंतलेला असतो.  या फसवणुकीच्या घटनांमुळे  देशाच्या आर्थिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. आता आयआयसीए आणि आरआरयू च्या सहकार्याने बँका, वित्तीय संस्था, तपास संस्था आणि आर्थिक परिदृश्यातील इतर व्यावसायिकांकडून संबंधित भागधारकांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि उन्नत कौशल्याव्दारे  देशाच्या आर्थिक सुरक्षेचे रक्षण करता येणार आहे.”

या सामंजस्य करारावर आयआयसीएच्यावतीने  प्राध्‍यापक  (डॉ) नवीन सिरोही यांनी स्वाक्षरी केली.  त्यांनी यावेळी  सामंजस्य कराराचे उद्दिष्टही सामायिक  केले. आरआरयूच्यावतीने राष्‍ट्रीय सुरक्षा आणि विधी विभागाच्या संचालक  डिंपल टी रावळ  यांनी आरआरयूच्या कामाचा  कृती आराखडा स्पष्ट केला आणि आभार मानले.

 

आयआयसीए विषयी माहिती:

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने स्‍थापन केलेली आयआयसीए  ही एक  स्वायत्त संस्था आहे.  कॉर्पोरेट क्षत्रासाठी ‘थिंक-टँक’  म्हणून ही संस्था  काम करते. भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढीला एकात्मिक आणि बहु-केंद्राद्वारे पाठबळ  देण्यासाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून आयआयसीए ची  स्थापना  केली आहे. तर  आरआरयू  ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे. आरआरयू हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा आणि पोलिस विद्यापीठ आहे.

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931195) Visitor Counter : 113


Read this release in: English , Urdu , Hindi