माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

गोवा दूरदर्शनच्या सुरळीत प्रक्षेपणासाठी डीडी फ्री डिशवर उपाययोजना

Posted On: 09 JUN 2023 5:49PM by PIB Mumbai

गोवा, 9 जून 2023

 

गोवा दूरदर्शन वाहिनी डीडी फ्री डिशवर प्रसारणात अडचणी येत असल्याबद्दलच्या तक्रारी दूरदर्शन केंद्राकडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींचे विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की, या गैरसोयीची दोन संभाव्य कारणे असू शकतात. एक म्हणजे MPEG-4 सॅटेलाइट टीव्ही सिग्नल-सक्षम सेट-टॉप बॉक्स नसणे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की MPEG-4 सिग्नल प्राप्त करण्याच्या क्षमतेने सुसज्ज असलेले सेट-टॉप बॉक्सवरच गोवा दूरदर्शनचे प्रसारण सुरळीत होईल.

दुसरी शक्यता म्हणजे MPEG-4 उपग्रह वारंवारता वापरून सेट-टॉप बॉक्स स्कॅन करण्यात येणाऱ्या अडचणी. यामुळे उपभोकत्यांनी MPEG-4 सॅटेलाइट फ्रिक्वेन्सीचा वापर करून त्यांचे सेट-टॉप बॉक्स पूर्णपणे स्कॅन करणे आवश्यक आहे.

दूरदर्शन केंद्र पणजी डीडी गोवा चॅनेलच्या सुलभ प्रसारणासाठी समस्यांचे सक्रियपणे निराकरण करत आहे. डीडी गोवा चॅनल डीडी फ्री डिश, डीटीएच प्लॅटफॉर्मवर चॅनल क्रमांक 97 वर उपलब्ध आहे. डीडी गोवा वाहिनीच्या प्रक्षेपणात अडचणी येत असल्यास त्वरित मदतीसाठी दिनकर यादव, सहाय्यक संशोधन अधिकारी-II – दूरध्वनी क्रमांक: 9420974151 (व्हॉटसअप) आणि एम. जी. कुलकर्णी, सहाय्यक अभियंता - दूरध्वनी क्रमांक: 9422348260 (व्हॉटसअप) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गोवा दूरदर्शन केंद्राने केले आहे.

 

* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931059) Visitor Counter : 98


Read this release in: English