अर्थ मंत्रालय
दिल्ली एअर कार्गो (निर्यात) सीमा शुल्क विभागाने अंमली पदार्थ आणि मनावर प्रभाव टाकणाऱ्या पदार्थांच्या (एनडीपीएस)तस्करांविरुद्धच्या लढ्यादरम्यान, 69 किलो अंमली पदार्थ जाळून नष्ट केले
Posted On:
06 JUN 2023 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2023
दिल्ली एअर कार्गोच्या (निर्यात) सीमा शुल्क विभागाने आज एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत समाविष्ट 69.876 किलो अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. नवी दिल्ली येथील एसएमएस वॉटरग्रेस बीएमडब्ल्यू या कंपनीद्वारे संचालित केंद्रीकृत जैव-वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रात ही कारवाई करण्यात आली.
प्रतिबंधित पदार्थांचा नाश करण्याची सदर कारवाई म्हणजे अंमली पदार्थ आणि मनावर प्रभाव टाकणाऱ्या पदार्थांची (एनडीपीएस)तस्करी करणाऱ्यांवर घातलेला मोठा घाव आहे. हे पदार्थ दोन टप्प्यांमध्ये जाळण्यात आले.
पहिल्या टप्प्यात, न्यू कुरियर टर्मिनल येथे 9 विविध प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या 1.997 किलो हेरॉईन, 4.236 किलो गांजा, 7.113 किलो केटामाईन आणि इतर प्रकारच्या एनडीपीएस पदार्थांचा समावेश असलेला एकूण 13.3 46 किलो साठा जाळून नष्ट करण्यात आला.
तर या कारवाईच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात, फॉरीन पोस्ट ऑफिस येथे 23 विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या 4.350 गांजा आणि 52.180 किलो केटामाईन, मेथ आणि इतर प्रकारच्या एनडीपीएस पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.
अंमली पदार्थ तस्करीच्या एकूण 32 विविध प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेला 69.876 किलो अंमली पदार्थांचा साठा (हेरॉईन तस्करीची 5 प्रकरणे, गांजा तस्करीची 4 आणि इतर एनडीपीएस पदार्थांच्या तस्करीची 23 प्रकरणे) घातक आणि इतर कचरा (एम & टीएम) नियम 2016 नुसार कारवाई करून दिल्लीच्या निलोठी येथील केंद्रीकृत जैव-वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रात जाळून नष्ट करण्यात आला. हे केंद्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे (एसपीसीबी) मान्यताप्राप्त आहे.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930328)
Visitor Counter : 106