कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
या वर्षासाठी नियोजित दोन महिन्यांची अमरनाथ यात्रा, सरकारचा आत्मविश्वास आणि लोकांचा उत्साह दर्शवते: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर नेहमीच आपले वक्तव्य कृतीत उतरवले असून त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादासाठी शून्य सहिष्णुतेची हाक दिली आहे : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
06 JUN 2023 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2023
या वर्षासाठी नियोजित दोन महिन्यांची अमरनाथ यात्रा सरकारचा आत्मविश्वास आणि लोकांच्या उत्साहाचे प्रतिबिंब दर्शवते, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांनी दहशतवाद आणि कट्टरवादाला चतुराईने हाताळून एक उत्तम उदाहरण स्थापित केले आहे, असेही डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर नेहमीच आपले वक्तव्य कृतीत उतरवले असून त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादासाठी शून्य सहिष्णुतेची हाक दिली आहे, असे मंत्री म्हणाले.
एकूणच शांततापूर्ण वातावरण आणि सरकारचा आत्मविश्वास आणि सर्वसामान्यांचा उत्साह यामुळे अनेक वर्षांनंतर प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये 1 जुलैपासून सुरू होणारी पवित्र अमरनाथ यात्रा 2 महिन्यांची असेल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. गेली काही वर्षे ही यात्रा सुरक्षा आणि इतर कारणांमुळे 15-20 दिवसांपर्यंतच मर्यादित होती, असेही त्यांनी सांगितले.
डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की जम्मू आणि काश्मीरमध्ये अलीकडील सर्वात यशस्वी जी 20 बैठकांचे आयोजन करण्यात आले. या बैठकीदरम्यान विचारमंथन , शिकारा सैर , गोल्फ, व्यस्त बाजारपेठेत खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग हा एक उत्साही क्षण होता. हा क्षण भविष्यातील मोठ्या कार्यक्रमांची नांदी ठरेल असे त्यांनी सांगितले.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930322)
Visitor Counter : 120