माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दूरदर्शनच्या थेट फोन-इन कार्यक्रम 'हॅलो गोंयकार'मध्ये नागरिकांशी साधणार संवाद
Posted On:
01 JUN 2023 5:13PM by PIB Mumbai
पणजी, 1 जून 2023
गोव्यातील जनतेशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 'हॅलो गोंयकार' या विशेष थेट फोन-इन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.दूरदर्शन केंद्र पणजी यांनी गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा अनोखा उपक्रम नागरिकांना त्यांच्या समस्या आणि तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रदान करणार आहे.
'हॅलो गोंयकार' कार्यक्रमाचा पहिला भाग 2 जून 2023 रोजी होणार आहे आणि तो संध्याकाळी 7.00 ते 7.55 या कालावधीत प्रसारित केला जाईल. सरकार आणि गोव्याचे नागरिक यांच्यात मुक्त आणि पारदर्शक संवाद प्रस्थापित करणे तसेच ज्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे महत्वपूर्ण मुद्दे मांडण्याची संधी नागरिकांना देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'हॅलो गोंयकार' मध्ये सहभागी होतील.
या विशेष थेट फोन-इन कार्यक्रमादरम्यान दर्शक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपूर्णपणे या कार्यक्रमासाठी असलेल्या 2222424 आणि 2225204 या दूरध्वनी क्रमांकांवर फोन करून संपर्क साधू शकतील. या थेट संवादामुळे राज्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची, स्पष्टीकरण मागण्याची आणि सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1929077)
Visitor Counter : 106