वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एप्रिल 2023 साठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक (आधार: 2011-12=100)
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2023 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2023
एप्रिल 2022 च्या निर्देशांकाच्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या (आयसीआय) एकत्रित निर्देशांकात 3.5 टक्क्यांनी (तात्पुरती) वाढ झाली आहे. खते, पोलाद, सिमेंट आणि कोळशाच्या उत्पादनात एप्रिल 2023 मध्ये मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढ झाली. आयसीआय ज्या आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाची एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मापन करते ते पुढील प्रमाणे आहेत. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मध्ये समाविष्ट केलेल्या वस्तूंच्या एकूण भारांकापैकी 40.27 टक्के भाग या आठ प्रमुख उद्योगांचा समावेश आहे. वार्षिक आणि मासिक निर्देशांक आणि वाढीचा तपशील अनुक्रमे परिशिष्ट I आणि II मध्ये प्रदान केला आहे.
जानेवारी 2023 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम वाढीचा दर 9.7 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:
- कोळसा - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये कोळशाच्या उत्पादनात 9.0 टक्क्यांनी वाढ झाली.
- कच्चे तेल - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.5 टक्क्यांनी घट झाली.
- नैसर्गिक वायू - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये नैसर्गिक वायू उत्पादनात 2.8 टक्क्यांनी घट झाली
- पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात 1.5 टक्क्यांनी घट झाली.
- खते - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये खत उत्पादन 23.5 टक्क्यांनी वाढले.
- पोलाद - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये पोलादाचे उत्पादन 12.1 टक्क्यांनी वाढले.
- सिमेंट - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये सिमेंट उत्पादन 11.6 टक्क्यांनी वाढले.
- वीज - एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये वीज निर्मिती 1.4 टक्क्यांनी घटली.
टीप: फेब्रुवारी 2023, मार्च 2023 आणि एप्रिल 2023 साठीची आकडेवारी तात्पुरती आहे. स्त्रोत संस्थांकडून येणाऱ्या अद्ययावत आकडेवारीनुसार प्रमुख उद्योगांचे निर्देशांक सुधारित/ अंतिम केले जातील.
टीप: एप्रिल 2014 पासून नवीकरणीय वीज निर्मिती स्त्रोतांकडून आलेल्या आकडेवारीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
टीप: मे 2023 साठीच्या निर्देशांक शुक्रवार 30 जून, 2023 रोजी जारी केला जाईल.
Annex I
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928781)
आगंतुक पटल : 191