शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आजीवन शिकण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी, भविष्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आणि ज्ञान आणि कौशल्य विकासाला धोरणात्मक भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ बनवण्यावर भारत आणि सिंगापूरची सहमती


धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि व्यापार आणि उद्योग मंत्री यांची भेट

Posted On: 29 MAY 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2023

 

विद्यमान संबंध दृढ करण्यासाठी आणि शिक्षण आणि कौशल्य विकासातील द्विपक्षीय सहभागाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तीन दिवसांच्या सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. प्रधान यांनी आज सिंगापूर सरकारच्या विविध प्रमुख मंत्र्यांची भेट घेतली आणि स्पेक्ट्रा माध्यमिक विद्यालयाला भेट दिली.

प्रधान यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्त मंत्री महामहिम लॉरेन्स वोंग यांच्याशी भारत आणि सिंगापूर यांच्यातील विद्यमान सहकार्य मजबूत करण्यावर आणि कौशल्य विकासातील प्रतिबद्धता अधिक दृढ करण्यावर एक रचनात्मक बैठक घेतली.  या बैठकीदरम्यान, आजीवन शिकण्याच्या संधी निर्माण करणे, भविष्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे आणि ज्ञान आणि कौशल्य विकासाला भारत आणि सिंगापूर मधील धोरणात्मक भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ बनवणे या उद्देशाने एकत्र काम करण्यावर सहमती झाली.

धर्मेंद्र प्रधान यांनी सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्री गन किम योंग यांच्याशी सखोल चर्चा केली.  कौशल्य विकास आणि आजीवन शिक्षणासाठी अखंड पायाभूत सोयी-सुविधा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांद्वारे कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण संबंध मजबूत करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. भुवनेश्वरमधील जी20 फ्युचर ऑफ वर्क कार्यशाळेच्या परिणामांवर यादरम्यान चर्चा झाली. विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि भारतीय कौशल्य परिसंस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी सिंगापूरच्या कौशल्याचा आणि ज्ञानाचा भारत कोणत्या मार्गांनी लाभ  घेऊ शकतो यावरही यादरम्यान चर्चा झाली.

प्रधान यांना सिंगापूरमध्ये कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी अवलंबल्या जाणार्‍या सर्वोत्तम पद्धती आणि मॉडेल्सचे विस्तृत अवलोकन करण्याची संधी मिळाली.  दोन्ही मंत्र्यांनी प्राधान्यक्रम ठरवताना कौशल्य, आजीवन शिकण्याच्या नवीन संधी निर्माण करण्यावर आणि आपल्या देशांच्या तसेच इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या फायद्यासाठी सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली.

   

नंतर, प्रधान यांनी स्पेक्ट्रा माध्यमिक विद्यालयाला भेट दिली.  यावेळी त्यांनी तेथील अध्यापन,शैक्षणिक वातावरण, अध्यापनशास्त्र इत्यादींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928165) Visitor Counter : 169


Read this release in: English , Urdu , Hindi