मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री परूषोत्तम रूपाला यांनी मत्स्यउत्पादकता वाढवण्यासाठी पर्यावरणावर किमान परिणाम करणाऱ्या शाश्वत मासेमारी वर दिला भर


केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या हस्ते अंदमान आणि निकोबार बेटांवर सागर परिक्रमाच्या सहाव्या टप्प्याला सुरूवात

Posted On: 29 MAY 2023 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2023

भारत सरकारच्या मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागाने, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आखलेल्या  सागर परिक्रमेच्या सहाव्या टप्प्याला आज सुरवात झाली.  सागर परिक्रमा कार्यक्रम हा पूर्व निश्चित केलेल्या सागरी मार्गाने आयोजित केला असून किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा त्यात समावेश केला आहे. दोन दिवसीय सहाव्या टप्प्याचा हा कार्यक्रम केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी भाषण करताना रूपाला यांनी वाढती मागणी पूर्ण करण्यात मत्स्यशेती करणाऱ्या उत्पादकांच्या महत्वपूर्ण भूमिका मान्य करून खाद्यपदार्थाचा एक अत्यंत महत्वाचा स्त्रोत आणि उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी आमचे मच्छीमार आणि मत्स्य शेती करणारे अथकपणे काम करत असल्याचे सांगितले. रूपाला यांनी पर्यावरणावर कमीत कमी परिणाम  होईल अशा पद्धतीने आणि केवळ उत्पादकता वाढेल, अशा पद्धतीची  शाश्वत मासेमारी करण्यावर भर दिला.

केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी उपस्थित असलेले मत्स्यशेती करणारे, मच्छीमार लाभार्थींशी संवाद साधला. अनेक लाभार्थींनी त्यांना प्रत्यक्ष मासेमारी करताना आलेले अनुभव रूपाला यांच्यासमवेत सामायिक केले आणि त्यांच्या प्रश्नांकडे ठळकपणे लक्ष वेधले. तसेच केसीसी आणि पीएमएमएसवायने मच्छीमारांच्या तसेच कोळी जमातीसाच्या आयुष्यात दिलेले  प्रचंड योगदान सांगितले. रुपाला यांनी मच्छीमार, मत्स्य शेती करणारे शेतकरी आणि किसान क्रेडिट कार्डधारकांसह इतर भागधारकांचा सत्कार केला.

रूपाला यांनी मोठी कोळंबी(टायगर श्रिंप) घरगुती पालन, निवडक प्रजनन, केंद्रक प्रजनन, कोळंबी मूल्यांकन अभ्यास युनिट स्थापन करणे आणि यासंदर्भात व्यापक प्रमाणावर कोळंबीचा पुरवठा करणे, इत्यादीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

केंद्रीय मंत्र्यांनी सेल्युलर तुरूंगालाही भेट दिली.

सागर परिक्रमा ग्रामीण भागात लोकांचे कल्याण आणि जीवनमानाचा दर्जा उंचावण्यावर परिणाम करणार असून जास्त उपजीविकेच्या संधी निर्माण करेल. सागर परिक्रमा मच्छीमार, इतर भागधारक यांचे प्रश्न सोडवण्यात मदत करणार असून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना(पीएमएमएसवाय), किसान क्रेडिट कार्ड सारख्या विविध मासेमारी योजनांच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती करण्यास सहाय्यक  ठरणार आहे. 

 

* * *

N.Chitale/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928164) Visitor Counter : 83


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil