पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

भारताने ऊर्जेची उपलब्धता, परवडणारे दर आणि शाश्वतता या ऊर्जा समस्यांचे यशस्वीपणे नियोजन केले


जागतिक ऊर्जा आव्हाने असूनही, भारतीय नागरिकांना कधीही पुरवठ्यात त्याची झळ बसली नाही

भारत 2070 पर्यंत ‘नेट कार्बन झिरो’ साध्य करण्यासाठी ऊर्जा संक्रमणाकडे वळला आहे

Posted On: 25 MAY 2023 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मे 2023

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस पुरी म्हणाले की, भारताने ग्राहकांसाठीच्या प्रभावी किंमतीत सुधारणा करण्यात यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यामुळे वाढीव दर  आणि आंतरराष्ट्रीय किमतीतील अस्थिरता यापासून सर्वसामान्यांना दिलासा देता आला आहे.

आपल्या शेजारील देशांना आणि कदाचित विकसित देशांना ऊर्जेचा जपून वापर , रिकामे पेट्रोल पंप  आणि इंधनाच्या वाढत्या किमती यासह अनेक समस्यांशी  झगडावे लागले, मात्र भारताच्या धोरणाने इंधनाची शाश्वत उपलब्धता यशस्वीपणे सुनिश्चित केली. 

हरदीप पुरी काल संध्याकाळी सीआयआय  वार्षिक सत्र 2023 मध्ये ‘ऊर्जा संक्रमणातून अमृत काळाला बळ ’ या सत्रात बोलत होते, ज्याची संकल्पना ‘भविष्यातील आकांक्षा : स्पर्धात्मकता, तंत्रज्ञान, शाश्वतता, आंतरराष्ट्रीयीकरण’ ही होती.  हरदीप पुरी यांनी अधोरेखित केले की स्थिर, सुरक्षित आणि किफायतशीर  ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज आहे कारण भारत आधी 5-ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे आणि नंतर 10-ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.  ते म्हणाले की ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि विशेषतः तेल आणि वायू क्षेत्रातील सुधारणा, ऊर्जा सुरक्षा, व्यवसाय  सुलभता आणि ऊर्जा संक्रमणाप्रति भारताची वचनबद्धता दर्शवतात.

2040 पर्यंत 1% जागतिक दराच्या तुलनेत भारताची ऊर्जेची मागणी  सुमारे 3% दराने वाढण्याची शक्यता आहे असे  ते पुढे म्हणाले. वर्ष 2000 पासून,ऊर्जेच्या  जागतिक मागणीत भारताचे  10% पेक्षा जास्त योगदान  आहे. दरडोई आधारावर, 2000 पासून भारतातील ऊर्जेची मागणी 60% पेक्षा जास्त वाढली आहे. आपली  वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे 2020 आणि 2040 दरम्यान जागतिक ऊर्जा वाढीचा एक चतुर्थांश हिस्सा भारताचा असणार आहे.

भारताने 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन हरित  हायड्रोजन उत्पादनाच्या लक्ष्यासह हरित हायड्रोजन धोरण लागू केले आहे असे सांगून  हरदीप पुरी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की भारत हे लक्ष्य केवळ साध्य  करणार नाही तर त्याही पलिकडे जाणार आहे. G20 अध्यक्षपदाच्या काळात भारताने अमेरिका आणि ब्राझील सोबत अलीकडेच ‘जैवइंधनावर जागतिक आघाडी ’ सुरू केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

A comparative analysis of international petrol and diesel prices vis-à-vis India is givenbelow.

Petrol (INR/ltr)

Diesel (INR/ltr)

Country

 April22

 April23

(%)

 April22

 April23

 (%)

Bangladesh

77.03

96.92

26

71.66

84.51

18

Sri Lanka

65.85

85.12

29

45.63

81.37

78

Nepal

97.89

112.67

15

87.16

110.77

27

France

145.23

173.45

19.43

143.63

161.27

12.28

Italy

140.34

169.12

20.51

139.04

157.95

13.60

UK

127.02

148.15

16.63

137.58

164.41

19.50

India (Delhi)

105.41

96.72

-8

96.67

89.62

-7

 

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927356) Visitor Counter : 118


Read this release in: English , Urdu , Hindi