संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका संरक्षण धोरण गटाची 17 वी बैठक संरक्षण सचिव आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे धोरणविषयक अवर सचिव यांच्या सहअध्यक्षतेखाली वॉशिंग्टन येथे संपन्न


संरक्षण सामग्री उत्पादन उद्योगांतील सहकार्य आणि सहउत्पादन वाढवण्यावर बैठकीत भर

Posted On: 17 MAY 2023 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 मे 2023


संरक्षण मंत्रालयाचे  सचिव गिरीधर अरमाने आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे धोरणविषयक अवर सचिव डॉ.कोलीन काल यांच्या सहअध्यक्षतेखाली काल 17 मे 2023 रोजी भारत-अमेरिका संरक्षण धोरण गटाची (डीपीजी)17 वी बैठक पार पडली. ही बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण तसेच उत्पादक ठरली. दोन्ही देशांच्या सचिवानी संरक्षण सामग्री उत्पादन उद्योगांतील सहकार्य वाढविण्याच्या तसेच भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रविषयक प्रमुख बाबींच्या भागीदारीला कार्यान्वित करण्याच्या दिशेने आतापर्यंत  झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांच्या लष्करांच्या दरम्यानचे सहकार्य, मुलभूत संरक्षण कराराची अंमलबजावणी, संयुक्त सराव कार्यक्रम तसेच हिंद महासागर क्षेत्रात सध्या सुरु असलेले आणि भविष्यात होऊ घातलेले सहकार्यविषयक उपक्रम यांच्या विषयीच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा करण्यात आली.
 
 तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी, दीर्घकालीन संशोधन आणि विकास तसेच पुरवठा साखळीची सुरक्षा वाढविणे इत्यादी मुद्द्यांसह, संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचे मार्ग आणि पद्धती यांच्यावर या चर्चेत अधिक भर देण्यात आला. भारतीय आणि अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील कंपन्या एकत्र येऊन काम करू शकतील अशी संभाव्य क्षेत्रे तसेच प्रकल्प यांच्यासह भारतातील सह-विकास आणि सह-उत्पादन यांना प्रोत्साहन देण्याबाबत देखील दोन्ही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातील अभिनव संशोधनविषयक परिसंस्थेचा वापर करून घेण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील स्टार्ट-अप उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील भागधारकांना उत्तेजन देण्याबाबत दोन्ही देशांनी संमती दर्शविली.

डीपीजी ही भारतीय संरक्षण मंत्रालय आणि अमेरिकेचा संरक्षण विभाग यांच्या दरम्यान कार्यरत असलेली अधिकारी स्तरावरील शिखर यंत्रणा आहे. ही यंत्रणा धोरणावर लक्ष केंद्रीत करुन द्विपक्षीय संरक्षण सहकार्यविषयक सर्व बाबींचा व्यापक आढावा घेते आणि आवश्यक तेथे मार्गदर्शन करते. 

 
*****

 Jaidevi PS/Sanjana/CYADAV

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1925063) Visitor Counter : 196


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil