आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 16 MAY 2023 11:08AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.66 कोटी लसींच्या मात्रा (95.21 कोटी  दुसरी मात्रा व 22.87 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 1,010 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,037 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% आहे.

गेल्या 24 तासात 2,100 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,44,37,304 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.56%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.07%)

आतापर्यंत एकूण 92.87 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,16,603 चाचण्या करण्यात आल्या.

***

Sushama K/Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924393) Visitor Counter : 120