नौवहन मंत्रालय

मुंबई बंदर प्राधिकरणाकडून 2022-23 या वर्षात 63.61 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी

Posted On: 15 MAY 2023 7:18PM by PIB Mumbai

मुंबई, 15 मे 2023

 

मुंबई बंदर प्राधिकरणाने 2022-23 या वर्षात 63.61 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी केली असून गेल्या वर्षीच्या (59.89 एमएमटी) तुलनेत 6.21% वृद्धीची नोंद केली आहे.  मुंबई बंदराने केलेला वाहतुकीच्या हाताळणीचा हा आतापर्यंतचा उच्चांक असून यापूर्वी 2016-17 या वर्षातील 63.05 दशलक्ष टनांच्या सर्वोच्च कामगिरीला मागे टाकले आहे.

या कामगिरीची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

  • जवाहर द्वीपमध्ये खनिज तेलाच्या हाताळणीचा 21.87 दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक( 2021-22 मध्ये 20.54 दशलक्ष टन)
  • पोलादाच्या मालवाहतुकीत (3.94 दशलक्ष टन) गेल्या वर्षीच्या तुलनेत 28.42% वाढ
  • ट्रान्सशिपमेंट कार्गो( लोहखनिज, कोळसा इ.) यांच्या हाताळणीचा 14.95 दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक.
  • क्रूझ : कोविड महामारीनंतर 2020-21 आणि 2021-22 या वर्षात कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे बंदरांमध्ये दाखल झाली नव्हती. 2022-23मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा सुरू झाल्या आणि मुंबई बंदराने 20 आंतरराष्ट्रीय आणि 71 स्थानिक क्रूझ जहाजांची हाताळणी केली.

गेल्या आर्थिक वर्षात मालवाहतुकीच्या कामगिरीच्या आधारे मुंबई बंदर हे देशातील आघाडीच्या बंदरांपैकी एक म्हणून उदयाला आले आहे.

मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी व्यापार आणि इतर हितधारकांकडून बंदराला सातत्याने दिलेल्या पाठबळाबदद्ल त्यांचे आभार मानले आहेत आणि त्यांना अतिशय किफायतशीर दरांमध्ये आवश्यक ती मदत आणि विकासात्मक सुविधात पुरवण्याची ग्वाही दिली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल जलोटा यांनी सर्व बंदर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची देखील प्रशंसा केली आहे.  

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924293) Visitor Counter : 134


Read this release in: English