पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या कलम 49एन आणि 49-ओ अंतर्गत तयार केलेल्या नियमांची अधिसूचना (2022 मधील सुधारणेनुसार)

Posted On: 12 MAY 2023 5:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2023

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 (1972 चा 53), वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन आणि वन्य प्राण्यांच्या शरीराच्या विविध भागांपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या व्यापाराचे नियमन आणि नियंत्रण यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करते.

या कायद्यामध्ये शेवटची सुधारणा 2022 मध्ये करण्यात आली. वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2022, हा 1 एप्रिल 2023 पासून लागू झाला. कायद्याच्या कलम 49 एन  नुसार, स्वतःच्या ताब्यात असलेल्या प्राण्यांचे प्रजनन अथवा अनुसूची IV च्या परिशिष्ट I मध्ये सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही वन्य जीवाचे कृत्रिमरित्या प्रजनन करणाऱ्या व्यक्तीला, वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2022 लागू झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत परवान्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 24 एप्रिल 2023 रोजी राजपत्र अधिसूचनेद्वारे कलम 49 एन  अंतर्गत हे नियम अधिसूचित केले आहेत.

पुढील लिंकवर हे नियम  पाहता येतील: http://moef.gov.in.

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1923732) Visitor Counter : 1781


Read this release in: English , Urdu , Hindi