युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
काश्मीर विद्यापीठात वाय 20 विचारविनिमय कार्यक्रम
Posted On:
11 MAY 2023 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2023
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून, 10 ते 11 मे 2023 दरम्यान काश्मीर विद्यापीठात युवा 20 (वाय 20) गटाचा वाय 20 विचारविनिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांगल्या भविष्याच्या कल्पनांबद्दल देशातील तरुणांशी विचारविनिमय करण्यासाठी आणि वाय 20 च्या पाच संकल्पनांपैकी एक, ‘हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे: शाश्वततेला जीवनाचा मार्ग बनवणे’ या विषयावर कृती कार्यक्रम पत्रिका तयार करण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आणि काश्मीर विद्यापीठाचे कुलपती मनोज सिन्हा यांच्या हस्ते वाय 20 विचारविनिमय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
काश्मीरमध्ये वाय 20 विचारविनिमय कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पाडला. यात तरुणांनी सुचवलेल्या धोरणात्मक उपाययोजना मांडण्यात आल्या. पोस्टर आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करून या कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. निलोफर खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर जम्मू आणि काश्मीरच्या स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांमुळे एक संध्याकाळ मंत्रमुग्ध करणारी ठरली.
इंडोनेशिया, मेक्सिको, तुर्कीए , रशिया, जपान, कोरिया प्रजासत्ताक, अमेरिका , ब्राझील आणि नायजेरिया यांसारख्या जी 20 देशांमधील 17 युवा प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय वाय 20 विचारविनिमय कार्यक्रमात सहभाग घेतला.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923515)
Visitor Counter : 182