केंद्रीय लोकसेवा आयोग
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या लेखी परीक्षा (I) 2023 चे निकाल जाहीर
Posted On:
02 MAY 2023 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2023
केंद्रीय लोक सेवा आयोगाने 16 एप्रिल 2023 रोजी घेतलेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या लेखी परीक्षा (I) 2023 च्या निकालाच्या आधारावर खाली उल्लेख केलेल्या अनुक्रमांकाचे उमेदवार 2 जानेवारी 2024 रोजी सुरु होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 151व्या अभ्यासक्रमात आणि 113 व्या भारतीय नौदल अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यामध्ये सेवा बजावण्यासाठीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. हे निकाल आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या यादीत दर्शविलेल्या अनुक्रमांकांच्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. त्यांना परीक्षेला प्रवेश देण्याबाबतच्या अटींच्या अनुषंगाने “उमेदवारांना लेखी परीक्षेच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या कालावधीत joinindianarmy.nic.in या भारतीय लष्कर निवड संकेतस्थळावर नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर सेवा निवड मंडळाच्या मुलाखतीसाठी निवड झालेली केंद्रे आणि तारखा यशस्वी उमेदवारांना दिल्या जातील आणि त्याची माहिती त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर कळविण्यात येईल. ज्या उमेदवाराने आधीच या संकेस्थळावर नोंदणी केली असेल त्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. या संदर्भात कोणतीही शंका अथवा Login समस्या असल्यास, तसा ईमेल dir-recruiting6-mod[at]nic[dot]in या ईमेल आयडी वर पाठवावा. ”
“उमेदवारांना वय आणि शैक्षणिक पात्रता यासंबंधीची मूळ कागदपत्रे सेवा निवड मंडळाच्या मुलाखतीदरम्यान संबंधित सेवा निवड मंडळाकडे सादर करण्याची देखील विनंती करण्यात आली आहे.” उमेदवारांनी केंद्रीय सेवा आयोगाला त्यांची मूळ कागदपत्रे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोगाच्या “सी” गेट जवळील सुविधा केंद्राशी प्रत्यक्षपणे अथवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर, कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क साधावा. याबरोबरच, सेवा निवड मंडळ अथवा मुलाखत यांच्याशी संबंधित समस्यांकरिता ज्या उमेदवारांनी लष्कर हा पहिला पर्याय म्हणून निवडला आहे त्यांना 011-26175473 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा joinindianarmy.nic.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी नौदल हा पहिला पर्याय म्हणून निवडला आहे त्यांना 011-23010097या दूरध्वनी क्रमांकावर अथवा officer-navy[at]nic[dot]in or joinindiannavy.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल तसेच ज्या उमेदवारांनी हवाई दल हा पहिला पर्याय म्हणून निवडला आहे त्यांना 011-23010231 Extn. 7645/7646/7610 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा www.careerindianairforce.cdac.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.
अंतिम निकाल घोषित झाल्याच्या तारखेनंतर (सेवा निवड मंडळाच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर) 15 दिवसांच्या आत आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या गुणपत्रिका प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यानंतर पुढील 30 दिवसांसाठी त्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
संपूर्ण निकालांसाठी येथे क्लिक करा.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921499)
Visitor Counter : 175