ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी ने कॅप्टिव्ह खाणींमधून कोळसा उत्पादनात नोंदवली 148% वाढ; एप्रिल, 2023 मध्ये 2.95 दशलक्ष मेट्रिक टन हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक मासिक पुरवठा
Posted On:
02 MAY 2023 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2023
एनटीपीसी भारतात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या तुलनेत एप्रिल, 2023 मध्ये तिच्या कॅप्टिव्ह खाणींमधून कोळसा उत्पादनात 148% वाढ नोंदवली आहे. एनटीपीसी ने एप्रिल 2022 च्या 1.11 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) च्या तुलनेत एप्रिल 2023 महिन्यात 2.75 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) कोळसा उत्पादन नोंदवले आहे.
भारतातील सर्वात मोठ्या उर्जा उत्पादकाने एप्रिल 2022 मधील 1.23 MMT कोळसा पुरवठा करण्याच्या प्रमाणात 140% वाढ नोंदवत एप्रिल 2023 मध्ये 2.95 MMT मासिक कोळसा पुरवठा करण्याचा आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला.
एनटीपीसी ने आर्थिक वर्ष 23 मध्ये 23.2 दशलक्ष टन कोळसा उत्पादन नोंदवले, जे तिच्या एनटीपीसी पाकरी-बरवाडी (झारखंड), एनटीपीसी चट्टी बरियातू (झारखंड), एनटीपीसी दुलंगा (ओदिशा), आणि एनटीपीसी तलाईपल्ली (छत्तीसगड) या चार कार्यरत कोळसा खाणींमधून वर्षभरापूर्वीच्या 14.02 दशलक्ष टनांच्या तुलनेत 65% वाढ दर्शवते.
कोळसा खाण संघांनी केलेल्या डिजिटायझेशनच्या उपक्रमांमुळे खाणकामातील कार्यान्वयन उत्कृष्टता वाढविण्यात मदत झाली आहे. सुधारित प्रक्रियांमुळे खाणकामात सुरक्षितता वाढवण्यात मदत झाली आहे आणि ई-एसएमपी, डिजिटलाइज्ड सुरक्षा व्यवस्थापन योजना आणि सुरक्षिततेसाठी मोबाइल अॅप, सचेतनची अंमलबजावणी देखील झाली आहे.
एनटीपीसी समूहाची स्थापित क्षमता 71,644 मेगा वॉट आहे.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921495)
Visitor Counter : 191