गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि राइट्स यांनी केल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
02 MAY 2023 3:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2023
घनकचरा आणि वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनात गती आणण्याच्या उद्देशानं गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि सह सचिव रुपा मिश्रा, अर्बन इन्फ्राचे कार्यकारी संचालक आर के दयाळ आणि राइट्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राहुल मित्तल यांच्या उपस्थितीत राइट्स बरोबर एसबीएम-यू 2.0 अंतर्गत एसडब्ल्यूएम आणि यूडब्ल्यूएम साठी तांत्रिक सहाय्याच्या उद्देशानं सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
राइट्सचा तांत्रिक सहाय्य विभाग (TSU) तीन वर्षांच्या कालावधीसाठी एसबीएम-यू ला सहाय्य करणार आहे. घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात तांत्रिक सहाय्य सक्षम करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. एसडब्ल्यूएम अंतर्गत, एकत्रित कार्य करण्यात सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा, टाकाऊ माल यासारख्या घनकचरा व्यवस्थापन सुविधा प्रक्रियेचं मानकीकरण आणि अभियांत्रिकी रचना यांचा समावेश असेल. सांडपाणी आणि गाळ व्यवस्थापन आणि पुनर्वापर, अभियांत्रिकी रचना आणि सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया युनिट्सची प्रक्रिया या क्षेत्रातील मानकं आणि वैशिष्ट्यांसाठी राइट्स तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. याव्यतिरिक्त सांडपाणी, प्रदूषित जल व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात नमुना निविदा कागदपत्रे तयार करण्यात आणि खरेदीसाठीही राइट्स सहाय्य करणार आहे.
मंत्रालय आणि राइट्स यांच्यातील हा सामंजस्य करार सार्वजनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या उद्देशान सुरक्षित नियंत्रण, संकलन आणि वाहतूक, उपचार आणि पुनर्वापर याद्वारे सर्वांना सुरक्षित आणि शाश्वत स्वच्छता देण्यासाठी राज्ये/यूएलबींना या योजनेच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करायला बळ देईल. स्वच्छ भारत मोहीम-शहरी 2.0 नुसार पूर्णपणे कचरामुक्त शहर निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून शाश्वत घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे.
S.Tupe/S.Naik/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921360)
Visitor Counter : 190