भारतीय निवडणूक आयोग

कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक आणि शेजारील राज्यांमधील निवडणूक व्यवस्था समन्वयाचा भारतीय निवडणूक आयोगाने घेतला आढावा.

Posted On: 01 MAY 2023 6:36PM by PIB Mumbai

 

कर्नाटक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 2023 च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था समन्वय यांचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने आज दूरदृश्य प्रणालीद्वारे एक आढावा बैठक घेतली. या बैठकीला कर्नाटक तसेच गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या सीमावर्ती राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, नोडल पोलीस अधिकारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नोडल अधिकारी तसेच तटरक्षक दल, अमली पदार्थ नियंत्रण विभाग, आयकर इत्यादींसह अंमलबजावणी संस्थांच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कर्नाटक राज्याच्या सीमेवर दक्षता वाढवण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या आढावा बैठकीत दिले. बेकायदेशीर रोकड, दारू, अमली पदार्थ, मोफत वस्तूंची सीमा पार तस्करी होऊ नये यासाठी सहा शेजारील सहा राज्यांमधील 185 आंतरराज्यीय तपासणी चौक्यांवर लक्ष ठेवण्याच्या गरजेवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी विशेष भर दिला. आजपर्यंत 305 कोटी रुपयांहून अधिक जप्तीची नोंद घेत (2018 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमधील 83 कोटी रुपये जप्तीच्या तुलनेत) मुख्य निवडणूक आयुक्तांनी धनाचा प्रभाव नियंत्रित करण्यात अपयशी ठरणार्‍या स्थानिक अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले. अधिकार्‍यांनी शेजारील सीमावर्ती राज्यांच्या पाठिंब्याने जप्ती वाढवण्याचे तसेच राज्यात प्रलोभनमुक्त निवडणुकीचा आयोगाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांमध्ये प्रशासनाची भीती निर्माण करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले. त्यांनी तटरक्षक दल आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकार्‍यांना बारीक लक्ष ठेवण्याचे तसेच अंमली पदार्थांचा धोका कमी करण्यास मदत करण्याचे निर्देशही मुख्य आयुक्तांनी दिले.

State

No of Interstate Check Posts

Names of the bordering Unit (No. of Check Posts)

Kerala

21

Kodagu (03)

Dakshin Kannada (09)

Mangalore City (07)

Mysore District (01)

Chamarajanagara (01)

Tamil Nadu

25

Bengaluru district (06)

Kolar (02)

Ramanagara (03)

KGF (04)

Chamarajanagara (10)

Andhra Pradesh

57

Chitradurga (08)

Ballari (13)

Raichur (02)

Tumkur (12)

Kolar (09)

Chikkaballapura (09)

KGF (04)

Telangana

24

Kalaburgi (08)

Yadagiri (03)

Raichur (03)

Bidar (10)

Maharashtra

53

Belagavi (18)

Vijayapura (11)

Kalaburgi (08)

Bidar (13)

Belagavi City (03)

Goa

5

Uttara Kannada (03)

Belagavi district (02)

Total

185

-

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921280) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi