आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 01 MAY 2023 10:46AM by PIB Mumbai

देशभरातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा).  

गेल्या 24 तासात 172 लस मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 47,246 इतकी आहे. 

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येचे प्रमाण 0.11% आहे. 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71% आहे.

गेल्या 24 तासात 6,037 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,43,70,878 इतकी झाली आहे. 

गेल्या 24 तासात 4,282 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर 4.92%, तर सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.00% आहे 

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.67 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 87,038  कोविड तपासण्या घेण्यात आल्या.

***

Shilpa P/Vikas Y/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921036) Visitor Counter : 142