अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाची आढावा बैठक

Posted On: 29 APR 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2023

 

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाची बैठक झाली. सीबीआयसी चे अध्यक्ष, महसूल अधिकारी आणि इतर सदस्य ह्या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत व्यापार सुविधा, करदात्यांसाठीच्या सेवा, व्यापारासाठीच्या तक्रार निवारण, अनुशासनात्मक प्रकरणे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना अंतिम रूप देणे आणि पलासमुद्रम इथे उभारल्या जात असलेल्या अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ (NACIN) च्या राष्ट्रीय सीमाशुल्क अकादमी, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ (NACIN) च्या आगामी परिसराच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

करदात्याच्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याच्या गरजेवर अर्थमंत्र्यांनी भर दिला. तक्रार निवारण संदर्भात  प्रत्येक क्षेत्रामध्ये जीएसटी व्यवस्थेचा भाग असलेल्या व्यापार आणि उद्योगातील सदस्यांशी त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जावा, जेणेकरून त्यांच्यासाठी उपाय शोधण्यासाठी समस्यांची पद्धतशीरपणे ओळख व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तक्रार निवारण प्रक्रियेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी तक्रारींचे निवारण करण्यासाठी अभिप्राय घेण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या आढावा बैठकीत  वित्तमंत्र्यांना 2022-23 च्या एकूण अप्रत्यक्ष कर संकलनातून किती महसूल जमा झाला याची माहिती देण्यात आली. या आर्थिक वर्षात, वस्तू आणि सेवा कर संकलन, 13.82 लाख कोटी इतके झाले. गेल्या वर्षी 12.89 लाख कोटी रुपये इतके होते.

अर्थमंत्र्यांनी सीबीआयसी ला त्यांची स्वयंचलित वस्तू आणि सेवा कर परतावे छाननी पुढील आठवड्यापर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आणि तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराद्वारे करदात्यांची संख्या वाढवण्यासाठी कृती योजना लागू करण्याचे निर्देश दिले. बनावट बिलिंग/इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) विरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी सीबीआयसीने आधीच बुक केलेल्या प्रकरणांच्या अभ्यास करून सर्वसमावेशक मूळ कारणांचे विश्लेषण करावे आणि त्रुटी टाळण्यासाठी शिफारसी कराव्यात असा सल्ला त्यांनी दिला.

 

* * *

R.Aghor/Radhika/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920818) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi