गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
'प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरा”- मन की बातच्या 98 व्या भागात पंतप्रधानांनी दिला स्वच्छतेचा कानमंत्र
मन की बात कार्यक्रमाने केले शतक पूर्ण
इंदोर शहराने स्वच्छतेत स्वतः ची एक खास ओळख निर्माण केली आहे - मन की बात कार्यक्रमाचा 80 वा भाग
Posted On:
29 APR 2023 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2023
“स्वच्छ भारत अभियानाने आपल्या देशात लोकसहभागाची व्याख्या बदलली आहे. देशात कुठेही स्वच्छतेशी संबंधित कोणतीही घडामोड होते तेंव्हा लोक मला त्याची माहिती देतात.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रमाच्या 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसारित भागात ही माहिती दिली होती.
मन की बात कार्यक्रमाचा 98 वा भाग 'कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती' या संकल्पनेवर आधारलेला होता. या भागात पंतप्रधानांनी ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील कमला मोहराना यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. कमला मोहराना एक स्वयं-सहायता गट चालवतात.. “या गटातील महिला दुधाच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक पॅकिंग साहित्यापासून टोपल्या, मोबाईल स्टँड अशा अनेक गोष्टी तयार करतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. हा उपक्रम स्वच्छतेची हमी तर देतोच; सोबतच या महिलांसाठी एक उत्पन्नस्रोत देखील ठरत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. आपण संकल्प केला तर स्वच्छ भारतासाठी मोठे योगदान देऊ शकतो. किमान आपण सर्वांनी प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्या वापरण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तुमची ही प्रतिज्ञा तुम्हाला समाधान देईल आणि इतर लोकांना प्रेरणाही देईल. हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसेलही.” असे पंतप्रधान म्हणाले.
“स्वच्छ भारत मिशन आज प्रत्येक भारतीयाच्या मनात घट्ट रुजले आहे. 2014 साली या जनआंदोलनाची सुरुवात झाल्यापासून हे अभियान नव्या उंचीवर नेण्यासाठी जनतेने अनेक अनोखे प्रयत्न केले आहेत. समाजात तसेच खेड्यापाड्यात, शहरात आणि कार्यालयातही ही मोहीम सर्व प्रकारे उपयुक्त ठरत आहे.” असे पंतप्रधानांनी शहरी स्वच्छता लोकचळवळीचे कौतुक करताना मन की बात कार्यक्रमाच्या एका भागामध्ये सांगितले.
30 एप्रिल 2023 रोजी मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होत असताना, स्वच्छता योद्ध्यांच्या स्फूर्तिदायक कथा सर्वांना ' एक कदम स्वच्छता की ओर ' चालण्यासाठी प्रेरित करतील.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920806)
Visitor Counter : 155