निती आयोग
azadi ka amrit mahotsav

आहारामध्ये भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात यावरील नीती आयोगाचा अहवाल जारी

Posted On: 26 APR 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

'आहारात भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम प्रघात' या शीर्षकाचा अहवाल नीती आयोगाने प्रसिद्ध केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी हा अहवाल जारी केला. यावेळी सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल, सदस्य (कृषी) डॉ. रमेश चंद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम उपस्थित होते.

हा अहवाल राज्य सरकारे आणि संस्थांनी भरडधान्य मूल्य-साखळीच्या विविध पैलूंमध्ये विशेषतः उत्पादन, प्रक्रिया आणि वापरामध्ये अवलंबलेल्या चांगल्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा एक संच सादर करतो. अहवाल तीन संकल्पनांमध्ये आहे. म्हणजे (a) भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मिशन आणि उपक्रम; (b) आयसीडीएस मध्ये भरडधान्यांचा समावेश; (c) संशोधन आणि विकास आणि नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी तंत्रज्ञानाचा वापर. हा अहवाल आपल्या आहारात भरडधान्यांच्या पुन्हा समावेशनासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शक भांडार म्हणून काम करेल.

यावेळी बोलताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी सांगितले, “हा अहवाल अत्यंत वेळेवर सादर झाला आहे. माननीय पंतप्रधानांनी भरडधान्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी धोरणात्मक पुढाकार घेतला आहे. हळूहळू, पर्यावरणीय शाश्वतता आणि आरोग्यावरील परिणामांशी निगडीत आहारांमध्ये बदल झाले आहेत आणि लोक आता भरडधान्यांच्या औषधी, पौष्टिक आणि दाह-विरोधी मूल्यांची प्रशंसा करू लागले आहेत. पुढची वाटचाल म्हणून, आम्हाला भरडधान्यांना सर्वोत्तम खाद्य म्हणून लोकप्रिय करण्यासाठी आणि फॅशनेबल बनवण्यासाठी ब्रँडिंग आणि विपणनाच्या महतीचा लाभ घ्यावा लागेल.”

मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम म्हणाले, “भरडधान्ये ही आमच्या आहारात सर्रास वापरली जायची. तथापि, आपल्या आहारात हळूहळू तांदूळ आणि गव्हाने  हे स्थान घेतले. मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांच्या वाढीमुळे भरडधान्यांचा पुन्हा आपल्या आहारात समावेश होऊ लागला. देशाच्या पोषण सुरक्षेमध्ये भरडधान्यांची अपार क्षमता आहे. आमच्या माननीय पंतप्रधानांनी भरडधान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि हे संकलन त्यात आणखी योगदान देईल.”

आहारात भरडधान्यांना प्रोत्साहन: भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वोत्तम प्रघात हा अहवाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920066) Visitor Counter : 186


Read this release in: English , Urdu , Hindi