आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आपल्याकडे योगाभ्यास आणि ध्यानधारणा यासारख्या प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य प्रणालींची मोठी परंपरा आहे, जी आता जागतिक चळवळ बनली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी


एक पृथ्वी-एक आरोग्य अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल मधील आयुष क्षेत्राचे सामर्थ्य दाखवण्यासाठी आयुष मंत्रालय या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले आहे

Posted On: 26 APR 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

वन अर्थ-वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023 च्या 6 व्या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे उद्घाटन केले.  पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहभागींचे स्वागत केले आणि आशा व्यक्त केली की ही परिषद  ''एक पृथ्वी-एक आरोग्य'' या विषयावर जागतिक भागीदारी मजबूत करेल.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा सर्वांगीण आरोग्यसेवेचा मुद्दा येतो  , या बाबतीत  भारताकडे खूप महत्त्वाची ताकद आहे. आमच्याकडे प्रतिभावान  आहेत . आमच्याकडे तंत्रज्ञान आहे. आमच्याकडे नोंदी आहेत. आमच्याकडे परंपरा आहे. हजारो वर्षांपासून भारताचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सर्वांगीण राहिला आहे. आमच्याकडे प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्याची मोठी परंपरा आहे. योगाभ्यास आणि ध्यानधारणा  यासारख्या प्रणाली आता जागतिक चळवळ बनल्या आहेत.  प्राचीन भारताने आधुनिक जगाला दिलेले हे वरदान आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुर्वेद प्रणालीत निरोगीपणावर भर दिला आहे. आरोग्याच्या शारीरिक आणि मानसिक पैलूंची ते काळजी घेते.”

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जग तणाव आणि जीवनशैलीसंबंधी आजारांवर उपाय शोधत आहे. भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये याची बरीच उत्तरे आहेत. आमचा भरड धान्ययुक्त पारंपारिक आहार  अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी देखील मदत करू शकतो.  आरोग्यसेवा विषयक  आव्हानांना जागतिक प्रतिसाद विखुरलेला आणि वेगळा करता येणार नाही कारण ही वेळ एकात्मिक, सर्वसमावेशक आणि संस्थात्मक प्रतिसादाची आहे. आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात हे प्राधान्य  क्षेत्रांपैकी एक आहे.

आयुष मंत्रालय मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल मध्ये आयुष क्षेत्राचे सामर्थ्य दाखवण्यासाठी या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले  आहे. आयुषचे सामर्थ्य आणि मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल मधील योगदान अधोरेखित करणाऱ्या  प्रदर्शनाद्वारे मंत्रालय आयुषची क्षमता देखील प्रदर्शित करत आहे. विविध देशांचे आरोग्य मंत्री, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते , शिक्षण आणि विषय तज्ञ आणि या कार्यक्रमात सहभागी होणारे इतर मान्यवर पारंपारिक औषधांची प्रत्यक्ष माहिती  घेण्यासाठी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट देतील.

ताज्या आकडेवारीनुसार मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलसाठी भारत हे मुख्य स्थान म्हणून उदयास आले आहे.  2017 मध्ये भारतात वैद्यकीय पर्यटनासाठी इच्छुक विदेशी पर्यटकांची संख्या 45,42,000 होती यावरून हे स्पष्ट होते. निरामय आरोग्य संबंधी पर्यटनावर  विदेशी पर्यटकांनी 12.8  अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च  ( 1 लाख कोटी)केला  आहे. वेलनेस, थेरप्युटिक केअर, कायाकल्प थेरपी, योग, ध्यान, परवडणारी आणि सर्वांगीण आरोग्य सेवा यासह उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा या वाढीचे कारण आहे.

या दोन दिवसीय शिखर परिषदेत 73 देशांतील 125 प्रदर्शक आणि 500 विदेशी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आफ्रिका, मध्य पूर्व, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स,सार्क आणि आसियान  देशांचे प्रतिनिधी भारतीय आरोग्य सेवा प्रदाते आणि परदेशी सहभागींना एका मंचावर  एकत्र आणतील.

 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919989) Visitor Counter : 172
Read this release in: English , Urdu , Hindi