उपराष्ट्रपती कार्यालय
मन की बात@100-उपराष्ट्रपतींनी केलेले भाषण
Posted On:
26 APR 2023 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
नमस्कार! सर्वांना माझा नमस्कार.
मी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा एकही भाग चुकवला नाही.देशाच्या इतिहासात 2014 हा महत्वपूर्ण वळणाचा टप्पा आहे. मी याला विकास म्हणेन ज्याने भारताचे नशीब घडवले आहे, आपल्याला प्रगती पथावर नेले आहे आणि आपण पूर्वी कधी नव्हे इतकी उंची गाठली आहे आणि ही घोडदौड थांबवणे अशक्य आहे.
2014 मध्ये, 30 वर्षांनंतर भारताला सदनात राजकीय स्थिरता मिळाली. मी 1989 ते 1991 पर्यंत डझनहून अधिक पक्षांच्या सरकारचा एक भाग होतो. त्या आघाडी सरकारमध्ये मी संसदीय कामकाज मंत्री होतो. मला माहित आहे आघाडी करावी लागणे हे किती भयंकर आहे. आघाडीमुळे आमच्या विकासाला खीळ बसली.
2014 मध्ये हा बदल घडला आणि 2014 मध्ये आणखी एक परिवर्तन झाले ज्यामुळे तुम्ही आणि आम्ही इथे आहोत. विजयादशमीच्या पवित्र प्रसंगी 3 ऑक्टोबर 2014 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात - ही अनोखी सुरुवात केली.
माझ्या मते त्यांची मन की बात प्रत्येक व्यक्तीच्या मनातील गोष्ट असते. त्यांचे म्हणणे प्रत्येक माणसाच्या मनाला भिडते. या मन की बात ने रेडियोला तर संजीवनी दिलीच , कारण तंत्रज्ञानात इतके बदल होत आहेत कि रेडियो खूप मागे पडत होता , मात्र आता आघाडीवर आला आहे. भारताच्या लोकांच्या विकास यात्रेत मन की बातचे किती योगदान आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही , मंत्रिमहोदयांनी खूप काही सांगितले आहे.
हा मोठा प्रवास, एक ऐतिहासिक मैलाचा दगड, अभूतपूर्व यशाचे शतक पूर्ण होत आहे 30 एप्रिल 2023 रोजी. मात्र हे शतक आहे देशाचे पंतप्रधान , महान नेते , पृथ्वीवरील सर्वात लोकप्रिय नेते ज्यांनी महात्मा गांधींचे विचार जगासमोर मांडले, जगणे ते स्वीकारले आणि ते म्हणाले की युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही, संवाद आणि चर्चा हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. आपण विस्तारवादाच्या युगात जगत नाही, असेही ते म्हणाले, खूप मोठे विधान त्यांनी केले.
खरं तर मन की बात हे आपल्या सभ्यतेच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. भारताने जेव्हा कोविड -19 चा कठीण काळ पाहिला, तेव्हा मी पश्चिम बंगालचा राज्यपाल होतो. मी मन की बातची जादू पाहून आश्चर्यचकित झालो. कल्पना करा, कुणी कधी विचार केला होता, पंतप्रधानांच्या एका हाकेवर कोरोना काळ सुरू होताना जनता कर्फ्यू झाला. लोकांना याचा अर्थ कळला नाही. मात्र दूरदर्शी पंतप्रधानांना पुढील धोका दिसला. जनतेने पूर्ण सहकार्य केले. ही खूप मोठी क्रांती आहे.
मन की बात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. राजस्थानचे ते दृश्य माझ्या लक्षात आहे ,उंटावर रेडिओ लटकत आहे आणि माणूस जात आहे , झाडाखाली शेती करणारे कुटुंब बसले आहे आणि रेडियो ऐकत आहे. मी सांगू इच्छितो की देशात दोन प्रवृत्ती खूप मजबूत आहेत; ज्यांवर अंकुश असायला हवा. एक म्हणजे आपल्याला खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयातच व्हायला हवा असतो, आणि दुसरे म्हणजे जगात कुठल्याही क्षणी राजकारण मागे हटत नाही. मात्र हे मन की बात मध्ये लागु नाही. मी विश्वासाने सांगू शकतो की मन की बात यापासून दूर राहिले आहे, यापासून लांब राहिले आहे.
हा जो कार्यक्रम होत आहे , त्याचे चार भाग आहेत. पहिला नारी शक्ति. नारी शक्तिचे मोठे उत्थान होत आहे , पूर्वी होत नव्हते, आता होत आहे. आपल्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत, खूप प्रतिभावान आहेत. त्यांच्याबरोबर राज्यपाल होण्याचे भाग्य मला लाभले आहे. हे बदलत्या भारताचे चित्र आहे. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ चे परिणाम समोर येऊ लागले आहेत. एका वाक्यात सांगायचे तर अलिकडच्या काळात पुरुषांसमोर ठाकलेले हे सर्वात मोठे आव्हान आहे. आम्हाला त्यांना त्यांची जागा द्यावी लागेलI, नाही तर हे मोदी राज आहे, इथे सगळे काही शक्य आहे.
दुसरे, विरासत का उत्थान. कुठे हरवलो होतो आपण, कुठे भरकटलो होतो आपण, आपला देश आपल्याला माहीत नाही. पंतप्रधान जेव्हा म्हणाले, पूर्वेकडे पहा, किती मोठा खजिना आहे संस्कृतीचा, निसर्गाचा .. आणि नावंही माहित नाही. आठ प्रांत कोणते आहेत, तिथून सुरुवात झाली. हा खूप मोठा बदल आहे. आपण सांस्कृतिकदृष्ट्या किती श्रीमंत आहोत , आपले सण-उत्सव कोणते आहेत , आपला वारसा काय आहे , आपल्या प्रत्येक जिल्ह्याचे योगदान काय आहे, मन की बात ने आपल्यासमोर चित्र ठेवले आणि एक भावना जागरूक झाली आणि आपल्याला त्या मार्गावरून पुढे वाटचाल करायची आहे.
जन समाजाद्वारे आत्मनिर्भरता, मी अनुरागजींचे शब्द उचलतो, मित्रांनॊ, 1989 मध्ये मी खासदार बनलो. ज्यामुळे माझ्या हातात खूप मोठी ताकद आली की मी एका वर्षात 50 गॅस जोडण्या कुणालाही देऊ शकतो. ...खासदाराच्या हातातील हे खूप मोठे अधिकार होते. आता पहा, मन की बातचे शिल्पकार , 150 दशलक्ष तर मोफत जोडण्या दिल्या, ज्यांना गरज होती त्या सर्वांना दिल्या.
मला अनेकदा काळजी वाटते , मनन आणि चिंतन करावे लागते की आपलेच अनेक लोक देशात किंवा बाहेर जाऊन अशिक्षितांसारखे का वागतात. भिंतीवर लिहिलेले त्यांना दिसत नाही का?
मी वरिष्ठ सदनाचा राज्यसभेचा अध्यक्ष आहे , जिथे गदारोळ सुरु असतो, बोलण्याचे स्वातंत्र्य पूर्ण आहे , म्हणूनच मला वैयक्तिक पातळीवर त्रास होतो आणि असेही वाटते की .आपल्या गुप्तहेर संस्था काय करत आहेत ? मोठे लेख लिहिले जातात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ... भारतासारख्या देशात असे कसे होऊ शकते ? एवढे मोठे स्वातंत्र्य आणि मुभा तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही.
वकील झालो, तेव्हा 6000 रुपये कर्जाची गरज भासली, लायब्ररीसाठी .. अजूनही त्या व्यवस्थापकाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आहे , ज्याने मला कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले. सुदैवाने 11 वर्षे वकिली करताना मी वरिष्ठ ऍडव्होकेट बनलो. आजचा काळ पहा, तुमच्याकडे नुसती कल्पना हवी, वित्तसहाय्याला मर्यादा नाही. मुद्रा कर्जाबाबत बघा ना , काय चमत्कार घडवला आहे या योजनेने , याची व्याप्ती चक्रावणारी आहे.
जेव्हा मी आसियानच्या माझ्या पहिल्या परदेश दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा जागतिक नेते स्तब्ध झाले होते, आश्चर्यचकित झाले होते आणि भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात, लस घेतलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवर 220 कोटी कोविड लस मात्रा प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत यावर विश्वास बसत नव्हता. कागदाची गरजच नाही, सर्वात विकसित राष्ट्रही एवढे करू शकले नाहीत . मन की बात मुळे हे साध्य झाले आहे.
खाद्यान्न संकट, मला माहीत आहे, मॅडम बेदींना माहीत आहे, त्या कठीण काळात आम्ही एकत्र पदांवर काम करत होतो, या देशातील 800 दशलक्ष लोकांना 1 एप्रिल 2020 पासून अन्नधान्य मिळायला सुरूवात झाली, तांदूळ, कडधान्ये, दर्जेदार डाळी- जे आजतागायत सुरू आहे. 80 कोटी लोकसंख्येत तर जगातील अनेक देश येतील, अनेक उपखंड येतील, तर हे जे लोककल्याण झाले, ती जादू आहे.
सामान्य माणसाला आपल्या अधिकारांची ओळख पटली. मी मन की बात @100 ला भारत @100 शी जोडतो. 2047 मध्ये आपण भारत@100 बनू. 2047 मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा भारत@100 चा मजबूत पाया रचण्यात मन की बातचे खूप मोठे योगदान आहे, मन की बात मजबूत पाया आहे.
मन की बात ने आणखी एक काम केलं आहे, पण त्याची चर्चा खूप कमी झाली आहे. मन की बात ने नकारात्मकतेवर प्रहार केला, मन की बात ने सकारात्मकतेला चालना दिली.
मन की बात ने खूप मोठी कामगिरी केली आहे, एक वेळ अशी होती, जेव्हा आपली जागतिक प्रतिमा सुयोग्य नव्हती. असं वाटत होतं, परिस्थिती कधी सुधारेल? आता वाटत आहे की हा तर मुद्दाच नाही, आता वाटत आहे की आपण सर्वोच्च स्थानावर कधी पोहोचणार?
महिलांनो आणि पुरुषहो, 2022 हा विकासाचा महत्वाचा टप्पा होता, जेव्हा भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली. मात्र, त्याहूनही महत्वाचं म्हणजे, आम्ही आमच्या वसाहतवादी शासकांवर मात केली, ज्यांनी आमच्यावर दोनशे वर्ष राज्य केलं. आता ही वेळ दूर नाही, येत्या दशकामध्ये भारत पृथ्वीवरची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
याचा संबंध मी मन की बात बरोबर जोडीन. यावर अभ्यास व्हायला हवा, की मन की बात ने किती रोजगार निर्मिती केली? किती कौशल्य विकास केला? मन की बात ने सर्वसामान्य कौशल्य असणाऱ्या कामगारांसाठी बाजार उपलब्ध केला. मन की बात ने स्थानिक कारागीरांचे मन की बात ने स्थानिक कारागीर, त्यांची प्रतिभा आणि कौशल्यांचं ब्रँडिंग केलं. थोडक्यात सांगायचं तर, आपण जेव्हा अंधाऱ्या बोगद्यात होतो, आणि प्रकाश कुठे आहे, हे आपल्याला माहित नव्हतं, त्या वेळी आपल्याला प्रकाश दाखवणारी मशाल म्हणजे, मन की बात आहे.
सर्वत्र राजकारण असलेल्या या देशात एमकेबी हा एक अराजकीय कार्यक्रम ठरला आहे. तो राजकीय प्रेरणेने असल्याचा समज निर्माण करणाऱ्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
पंतप्रधानांच्या उदात्त भावनांची कल्पना करा, ‘मन की बात’चा प्रवास 2 महिने वगळता अविरत सुरू आहे, एक राजकीय नेता म्हणून त्यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, हा कार्यक्रम स्वेच्छेने दोन महिने थांबवला होता. तो विविधतेचा एक गुच्छ आहे.
आपल्या देशात अजूनही जातीधर्माचे संकुचित हितसंबंध प्रभावी आहेत, चुकीचे मार्गदर्शन करतात. विविधतेतील एकतेच्या आधारे आपल्याकडे असलेल्या प्रतिभेचा आपण उपयोग करू शकत नाही, मन की बात ने जनआंदोलनाचा आश्रयदाता बनून हे करून दाखवून दिलं आहे.
मला लोकांनी विचारलं की जनतेची ही ( करोना काळातील) जमावबंदी कायदेशीर आहे का? मी म्हटलं की माझ्या मते तर नाही, कारण जमावबंदी तर चिंता निर्माण करते, पण ही जनतेची जमावबंदी ना चिंता निर्माण करणारी ठरली, ना पोलिसांवरही ताण पडला, ना लोकांना सांगावं लागलं, आणि त्याचा परिणामही चांगला झाला आहे. दुसरं जन आंदोलन पहा, आपल्या कोविड योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी मेणबत्त्या लावल्या, थाळी वाजवायला लावली, जे आपल्या संकृतीमध्ये आनंदाच्या वेळी केलं जातं, आपल्या कोविड योद्ध्यांच्या वचनबद्धतेला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सलाम करण्यासाठी हे केलं.
हे वेगळं का आहे? हे आपल्या लोकांच्या आकांक्षेनुसार काम करतं, याने त्यांना प्रोत्साहन दिलं आणि ताठ मानेने जगण्याची प्रेरणा दिली आणि हे बदललेलं चित्र मला दिसत आहे. तेव्हा आर्थिक योजना लक्षात येतात. आपल्याकडे 80,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत, ज्याचा जगाला हेवा वाटतो. देशाची सर्वात मोठी ताकद भू-राजकीय असून, या ठिकाणी धोरणात्मक परिस्थिती अधिक महत्त्वाची ठरते, जी आपल्या जनतेचं मनोबल टिकवून ठेवते. देशाच्या जनतेचं मनोबल सर्वोच्च स्तरावर आहे आणि आपण देश सर्वप्रथम हेच शिकलो. याची सुरवात तर यापूर्वीच झाली होती. स्वामी विवेकानंद यांनी हे सांगितलं होतं. त्यांनी यावर लक्ष केंद्रित केलं, पण मोदी जी यांनी ते कृतीत उतरवलं. मन की बातच्या माध्यमातून स्वच्छता अभियान कुठून कुठे पोहोचवलं. पण आपली माध्यमं आणि गुप्तचर यंत्रणा अशा लोकांवर अंकुश का ठेवत नाही, जे कोत्या मानाने देश हिताकडे दुर्लक्ष करतात, अशा लोकांनी कोविड काळात असं म्हटलं होतं की भारत लस बनवूच शकणार नाही, बनवली तर ती प्रभावी नसेल यासाठी आपल्याला ती बाहेरून आयात करायला हवी, मी जिथे कुठे गेलो, तिथल्या लोकांनी मला सांगितलं की, तुम्ही बनवलेल्या लसी अत्यंत प्रभावी आहेत.
महिलांनो आणि पुरुषहो, आता आपण भारतीय असण्याचा आणि आपल्या ऐतिहासिक यशाचा अभिमान बाळगायला हवा. हे उदात्त आहे. अमित जी, तुम्ही आपल्या चित्रपटांच्या वेळी हे पाहिलं असेल, सुरुवातीला लोक म्हणाले असतील की हा चित्रपट तर फ्लॉप ठरेल, पण तो आश्चर्यकारक पणे यशस्वी ठरला असेल. कधीतरी तुम्हालाही याचे मोठे आश्चर्य वाटले असेल. प्रतिभेचा उपयोग चांगल्या उद्देशाने केला, तर त्याचा परिणाम चांगलाच असतो.
पंतप्रधानांची मन की बात त्यांच्या मनातून थेट आपल्या हृदयाशी जोडली गेली आहे, मन की बात ने सर्वांच्या मनाला स्पर्श केला आहे, जी प्रभावी आणि उपयोगीही ठरली आहे.
मन की बात ने क्रांती केली आणि सकारात्मक बदल घडवला, लोकांच्या जीवनात बदल आणला आणि ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती, ते शक्य करून दाखवलं. यासाठी किती खर्च आला? आर्थिक कल असणाऱ्यांनी या योजनेच्या आर्थिक कामगिरीचा अभ्यास करावा.
आपल्या इतिहासातील या प्रसंगाचा भाग बनताना मला आनंद होत आहे, जिथे भारत एका चांगल्या युगाकडे वाटचाल करत आहे, जे 2047 मध्ये साध्य होणार आहे. मन की बात चे मागील भाग तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देतील आणि आपल्या संस्कृतीचा इतिहास आपल्यासमोर उलगडतील असं मी आपल्याला आवर्जून सांगेन.
रांची इथे किती वेळा गेलो, बिरसा मुंडा विमानतळ, मात्र त्यापुढे काहीच नाही. आज भगवान बिरसा मुंडा यांचा जयंती दिन, आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो, नेताजी सुभाष चंद्र बोस, ज्यांनी पोर्ट ब्लेअर इथे पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकवला होता, आज बेटांची नावं बदलली गेली आहेत, आणि ते इंडिया गेट इथे विराजमान झाले आहेत आणि त्यांचा जयंती दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा होत आहे. आपण डॉक्टर आंबेडकर यांना विसरलो होतो, पण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं आहे, अशा प्रत्येक स्थळाचा आज गौरव होत आहे.
यापूर्वी पद्म पुरस्कार दोन श्रेणींमध्ये दिले जात होते. अतिशय पात्र आणि ज्यांना संरक्षण मिळत होते. मोदी जी यांनी संरक्षण संपवलं. पंतप्रधानांनी काही उद्योगांना संपवलं आहे, मध्यस्थांचा उद्योग, मला अजूनही राजीव गांधी, जे माझे चांगले मित्र होते, त्यांच्या वेदना आठवतात, हे म्हणाले होते, “केवळ पंधरा पैसेच पोहोचतात”, आज पंधरा पैशांचीही गळती होत नाही. आता आयकर पडताळणी फेसलेस आहे, आता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आहे. डीबीटी चा आकडा अभूतपूर्व आहे.
महिलांनो आणि पुरुषहो, आपण आज अशा काळात राहत आहोत, जिथे सत्तेचे सर्व रस्ते मध्यस्थांपासून सरकारवर पाळत ठेवणाऱ्या दलालांपासून मुक्त करण्यात आले आहेत. आपली प्रशासकीय सेवा पहिल्यांदाच सुसज्ज आहे आणि त्यांचे हात बांधलेले नाही आणि ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.
पुन्हा एकदा संपूर्ण देशाला शुभेच्छा, मन की बातच्या शिल्पकाराला सलाम, मन की बात @100 चा टप्पा गाठल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, त्यांना भारत@100 वर भारताचे नशीब घडवण्यासाठी शुभेच्छा.
* * *
G.Chippalkatti/Sushma/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919967)
Visitor Counter : 197