युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने G20 अंतर्गत आयोजित केलेल्या वाय 20 शिखर परिषद-पूर्व बैठकीला उद्या लेहमध्ये प्रारंभ
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि लेह-लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर. (डॉ.) बी.डी. मिश्रा (निवृत्त) बैठकीला संबोधित करतील
सुमारे 30 देशांतील 100 हून अधिक प्रतिनिधी शिखर परिषद-पूर्व बैठकीला उपस्थित राहणार आहेत
Posted On:
25 APR 2023 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्रालयाने G20 अंतर्गत आयोजित केलेल्या वाय 20 शिखर परिषद-पूर्व बैठकीला उद्या प्रारंभ होणार असून 100 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 26 ते 28 एप्रिल दरम्यान या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


नागराज नायडू काकनूर, सहसचिव G20, सौगात बिस्वास, विभागीय आयुक्त, लडाख; पंकजकुमार सिंग, संचालक, युवा व्यवहार; मनीष गौतम, संचालक, पत्र सूचना कार्यालय ; फलित सिजारिया, Y20 इंडिया सचिवालयाचे प्रतिनिधी आणि प्रा. राजेंद्र एस. ढाका, अध्यक्ष इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स (INYAS) यांनी आज लेह येथे वाय 20 शिखर परिषद-पूर्व बैठकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना संबोधित केले.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना, G20 चे संयुक्त सचिव नागराज म्हणाले की, ही बैठक प्रामुख्याने जगातील युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आहे. लेहमध्ये आयोजित करण्यात येणारी ही शिखर परिषद पूर्व बैठक भारतासाठी एक मोठी संधी आहे ज्यात 30 हून अधिक देशांतील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत, असे ते म्हणाले. यावर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली “एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य” या संकल्पनेवर G20 चे आयोजन बैठकांचे केले जात आहे. आजच्या युवकांना त्यांच्या भविष्याची खूप काळजी आहे, हवामान बदलावर अधिक भर आहे. कारण त्यांना भविष्यात हाच ग्रह वारसाहक्काने मिळणार आहे.त्याचबरोबर आरोग्य आणि खेळाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की जगभरातून युवक सहभागी होत आहेत आणि उद्या त्यांना लेह आणि तिथली सुंदर संस्कृती अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
G20 अध्यक्षपदाच्या चौकटीत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग युथ 20 शिखर परिषद-2023 चे आयोजन करणार आहे. युथ 20 हा G20 च्या अधिकृत प्रतिबद्धता गटांपैकी एक आहे. देशाच्या तरुणांना चांगल्या भविष्यासंबंधी कल्पनांवर सल्लामसलत करण्यासाठी आणि कृतीसाठी एक अजेंडा तयार करण्यासाठी युथ 20 (Y20) प्रतिबद्धता गट संपूर्ण भारतभर चर्चांचे आयोजन करत आहे . वाय 20 युवकांना G20 प्राधान्यक्रमांबद्दल त्यांचे विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.
भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी 1 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत G20 अध्यक्षपद स्वीकारले आहे. अध्यक्षपदाची भारताची संकल्पना 'वसुधैव कुटुंबकम्' या सांस्कृतिक मूल्य प्रणालीमध्ये निहित आहे. म्हणून आपली संकल्पना आहे - 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य'.
वाय 20 शिखर परिषद पूर्व बैठक इतर हितधारकांबरोबर सहकार्य आणि नेटवर्किंगसाठी संधी प्रदान करेल आणि युवकांच्या विकासात योगदान देईल. सर्व संबंधित हितधारक या संधीचा लाभ घेतील, एकमेकांच्या संपर्कात राहतील अशी अपेक्षा आहे.
संबंधित लिंक :
https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1889239
संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा.
संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919668)
Visitor Counter : 219