रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अपघातमुक्त,निर्दोष सेवा देणाऱ्या 42 बस चालकांना सुरक्षा पुरस्कार प्रदान

Posted On: 18 APR 2023 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023

सार्वजनिक वाहतूक सेवेमध्‍ये बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या  प्रयत्नांचा गौरव करण्‍याच्या  उद्देशाने, ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) ने आज नवी दिल्ली येथे ‘हिरोज ऑन द रोड’ असा पुरस्कार देवून 42 चालकांचा  सत्कार  केला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव  अलका उपाध्याय यांनी त्यांच्या विनाअपघात, निर्दोष  सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमासाठी देशभरातील  42 चालकांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षा पुरस्कार प्रदान केले. यामध्‍ये पहिल्या   17 चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात करता  30 वर्ष सेवा दिल्याची नोंद आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील एकूण सहा  चालकांचा समावेश आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. घोडके किसन रामभाउू (36 वर्ष अपघातमुक्त सेवा ) आणि मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार मुल्ला (29 वर्ष अपघातमुक्त सेवा ) अशी या गुणवंत चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवंड( 26 वर्ष अपघातमुक्त सेवा ) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील आवटे राजेंद्र महादेव (25 वर्ष अपघातमुक्त सेवा ), पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (24 वर्ष अपघातमुक्त सेवा ), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष अपघातमुक्त सेवा ) यांचा आज गौरव करण्‍यात आला.

सध्या, महानगरपालिका अंतर्गत 80 राज्य मार्ग परिवहन उपक्रम  हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत जे संयुक्तपणे अंदाजे 1,50,000 बस चालवतात आणि सुमारे 70 दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा  प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्‍याने  मुख्यत्वे सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुधारणा घडवून आणत आहे. तसेच  नवनवीन  घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, वाहतूकविष्‍यक प्रमुख समस्या/आव्हाने ओळखण्यासाठी विविध बैठका, परिषदा आणि परिसंवाद/कार्यशाळा यांचे आयोजन करत आहे.  राज्य रस्ते वाहतूक उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच म्हणून एएसआरटीयू  कार्यरत आहे. 

शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन दक्षता, यावर आधारित रस्ता सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मंत्रालयाने संबंधित संस्था आणि भागधारकांसह एक बहु-आयामी धोरण तयार केले आहे. एसआरटीयूच्या गाड्यांसंदर्भात रस्ते अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे (0.09 अपघात दर) काही एसआरटीयूने शहरी वाहतुकीमध्‍ये  सरासरी 0.09 (हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू - सेलम, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार आणि दिल्ली) पेक्षा खूपच कमी अपघात दर आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत:

अ.   चालक संबंधित

1. भर्तीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे.

2.  निवडलेल्या चालकांना भर्तीच्या वेळीच प्रशिक्षण देणे आणि अद्यतन प्रशिक्षण देणे.

3.  प्रोत्साहन देण्‍यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  करणे.

ब. वाहन संबंधित

1.वेळापत्रकानुसार बसची देखभाल करणे आणि ब्रेक, स्टीयरिंग, हेडलाइट्स, टायर इत्यादी सुरक्षेशी संबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे.

2. चालकाच्या आसनाचे ‘अर्गोनॉमिक डिझाइन’

3. नेहमी वाहनाच्या दुरूस्तीची खात्री करणे.

क.  कार्याचे वेळापत्रक 

1. कामाचे वेळापत्रक  आणि चालकांना योग्य विश्रांतीच्या अंतरासह रोस्टर पद्धतीने काम

2.  सर्व सुविधांसह कर्मचाऱ्यांना  प्रसाधनगृहे

ड. प्रोत्साहनपर   उपाय

1. वर्षातून किमान एकदा सर्व चालकांसाठी अद्यतन  प्रशिक्षण कार्यक्रम सुनिश्चित करणे.

2.  डेपो, प्रदेश, विभाग आणि राज्य स्तरावर अपघातमुक्त सेवा चालकांना रोख पुरस्कार आणि प्रमाणपत्रे.

List of Drivers for Safety Awards

s. No.

Name of the Driver

STU

Years of

Accident

Free Service

Category

1

Kedari Tammanna Bakari

North west Karnataka Road Transport Corporation

38

Mofussil

2

Akula Mahaboob Basha

Andhra Pradesh State Road Transport Corporation

36

Mofussil

3

Ghodke Kisan Rambhau

Maharashtra State Road Transport Corporation

36

Mofussil

4

Kallu Somi Reddy

Telangna State Road Transport Corporation

35

Mofussil

5

Lakshmana Reddy

Bengaluru Metropolitan Transport Corporation

35

City

6

Kandhi Ranga Reddy

Telangna State Road Transport Corporation

35

City

7

Shaik Dayan

Odisha State Road Transport Corporation

34

Mofussil

8

Siyaram Chaudhary

Rajasthan State Road Transport Corporation

34

Mofussil

9

P. Swaminathan

TamilNadu State Road Transport Corporation -Villupuram

34

Mofussil

10

Eajaz Ahamed Sharif

Karnataka State Road Transport Corporation

33

Mofussil

11

S. A. N. Raju

Andhra Pradesh State Road Transport Corporation

33

City

12

Ishaq Shariff

Karnataka State Road Transport Corporation

33

City

13

Mir Pirubhai Chhotubhai

Gujrat State Road Transport Corporation

32

Mofussil

14

Divan Singh

Uttarakhand Transport Corporation

32

Mofussíl

15

N. Shanmugasundaram

Tamil Nadu State Road Transport Corporation - Coimbatore

31

rait/

16

T. Maria Gnaiah

Tamil Nadu State Road Transport Corporation - Tirunelvelí

30

City

17

M. Rajendiran

Tamil Nadu State Road Transport Corporation - Villupuram

30

City

18

Mohd. Rafique Abdul Sattar Mulla

Maharashtra State Road Transport Corporation

29

City

19

Suresh N. Bhavikatü

North west Karnataka Road Transport Corporation

29

City

20

M. Ramesh

Tamil Nadu State Road 'Transport Corporation - Madurai

28

Mofussil

21

IP. Angamuthu

Tamil Nadu State Road Transport Corporation - Salem

28

City

22

K. Andamuthu

Tamil Nadu State Road Transport Corporation - Coimbatore

27

Moíussil

23

C. Revichandran

Tamil Nadu State Road Transport Corporation - Kumbhkonam

27

Mofussil

24

S. Pairaj

Tamil Nadu State Road Transport Corporation - Kumbhkonam

27

City

25

(S. Veeramani

Metropolitan Transport Corporation (Chennai)

26

City

26

Nandkumar Lawand

Navi Mumbai Municipal Transport

26

City

27

Kanagaraj

Tamil Nadu State Road Transport Corporation - Madurai

26

City

28

Aw;te Rajendra Mahadev

Solapur Municipal Transport Corporation

25

City

29

krun Narayan Kuchekar

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd.

24

City

30

S. Ravichandran

State Express Transport Corporation

23

Mofussil

31

V. Thirumatai

Tamil Nadu State Road Transport Corporation - Salem

23

Mofussil

32

II. Meenatshi Sundaram

Tamil Nadu State Road Transport Corporation -Tirunelveli

22

Mofussil

33

Girijashankar Laltaprasad Pandey

BEST Undertaking

21

City

34

Shemar V. Bhat

Kadamba Transport Corporation Ltd.

20

Mofussil

35

Muktltjar Singh

Pepsu Road Transport Corporation

17

Mofussil

36

N. Abdul Rasheed

Kerala State Road Transport Corporation

16

City

37

S. Somenkatte

Kalyan Karnataka Road Transport Corporation

15

Mofussil

 

Shravan Kumar

Kalyan Karnataka Road Transport Corporation

15

City

39

Aneeshkumar

Kerala State Road Transport Corporation

13

Mofussil

40

Pranjal Borah

Assam STransport Corporation

11

Mofussil

41

Bhaskar Kalita

Assam STransport Corporation

 

City

42

Anand kurnar

Utter Pradesh State Road Transport Corporation

 

Mofussil

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1917781) Visitor Counter : 205


Read this release in: Hindi , English , Urdu