आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दुसऱ्या G20 आरोग्य विषयक कार्य गटाच्या बैठकी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्‌घाटन सत्राला केले संबोधित


‘जागतिक सार्वजनिक वस्तूंच्या’ संस्कृतीला चालना देत, आरोग्य विषयक सर्व डिजिटल उपायांची लोकशाही पद्धतीने उपलब्धता वाढवण्यावर भारताचा विश्वास: डॉ. मनसुख मांडवीय

भारताच्या आरोग्यसेवा विचारसरणीचा गाभा डिजिटल हस्तक्षेपांमध्ये आहे, जो रुग्ण-केंद्रिततेच्या तत्त्वाचे प्रत्येक टप्प्यावर समर्थन करण्यासाठी पारंपरिक आरोग्य सेवा पद्धतींचा काल-सुसंगत वापर करतो: डॉ. भारती प्रवीण पवार

Posted On: 18 APR 2023 8:52PM by PIB Mumbai

पणजी, 18 एप्रिल 2023

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज दुसऱ्या G20 आरोग्य विषयक कार्य गटाच्या बैठकी निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण केले. डिजिटल आरोग्य सेवा आणि नवोन्मेषाचा लाभ देणाऱ्या सार्वत्रिक आरोग्यासाठीच्या, नागरिक-केंद्रित आरोग्य सेवा परिसंस्थेवरील कार्यक्रमाची आज सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.  

भारताचा विश्वास जागतिक सार्वजनिक वस्तूंच्या संस्कृतीला चालना देऊन, सर्व डिजिटल आरोग्य विषयक उपाययोजनांच्या लोकशाही पद्धतीने समान वाटपावर  आहे, असे यावेळी डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितले. हा कार्यक्रम डिजिटल आरोग्य सेवेमधील परिवर्तन घडवण्याची क्षमता आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी उपयोगी ठरणारे नवोन्मेष, याचा धांडोळा घेईल असे ते म्हणाले.

नागरिकांच्या फायद्यासाठी वापरल्या गेलेल्या डिजिटल हस्तक्षेपांची अनेक उदाहरणे देत, देशात कोविड व्यवस्थापनाला दिशा देण्यासाठी डेटा-संचालित दृष्टीकोन कसा वापरण्यात आला, आणि त्याच वेळी कोविड-19 महामारी दरम्यान डिजिटल माध्यमातून आरोग्यसेवा सेवेचे वितरण कसे करण्यात आले, हे डॉ. मांडवीय यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदान असलेली आरोग्य विमा योजना, PM-JAY, 500 दशलक्ष भारतीय नागरिकांना पेपरलेस (कागद-रहित) आणि कॅशलेस (रोकड-रहित) पद्धतीने दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील सेवा कशी प्रदान करत आहे, हे त्यांनी नमूद केले.

सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत, डिजिटल आरोग्य सेवेसाठी जागतिक प्रयत्नांच्या माध्यमातून, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र यावे, असे आवाहन डॉ. मांडवीय यांनी केले. जागतिक स्तरावर आरोग्य सेवा वितरणामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, तांत्रिक सहाय्य प्रदान करण्याची आणि डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, डेटा सर्वांसाठी उपलब्ध व्हावा, यासाठी भारत डिजिटल आरोग्यामध्ये ‘इगो-सिस्टम दृष्टिकोना’ कडून, ‘इको-सिस्टम’ दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहे, आणि अशा प्रकारे सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

डॉ. भारती प्रवीण पवार यांनी भारताचा डिजिटलदृष्ट्या सक्षम देश बनण्याचा प्रवास, आणि रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवांसाठी डिजिटल आरोग्य परिसंस्थेची गरज अधोरेखित केली. डिजिटल आरोग्याबाबत जागतिक धोरणां अंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारताने जागतिक आरोग्य संघटनेबरोबर केलेल्या सहयोगाबाबत, आणि आणि ग्लोबल साउथवर (विकसनशील देशांवर) विशेष  विशिष्ट लक्ष केंद्रित करून डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा प्रचार करण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, भारताच्या आरोग्यसेवा विचारसरणीचा गाभा डिजिटल हस्तक्षेपांमध्ये आहे, जो रुग्ण-केंद्रिततेच्या तत्त्वाचे प्रत्येक टप्प्यावर समर्थन करण्यासाठी पारंपरिक आरोग्य सेवा पद्धतींचा काल-सुसंगत वापर करतो.

उद्घाटन सत्रात, सामंजस्यपूर्ण जागतिक डिजिटल आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यावर पॅनेल चर्चासत्र झाले. डिजिटल तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमता उपयोगात आणण्यासाठी आणि डिजिटल विभाजनाला आळा घालण्यासाठी डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा वापर करण्यावर चर्चा सत्रात भर देण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एस. गोपालकृष्णन यांनी चर्चासत्राचा संदर्भ नमूद केला. वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय, सिमो कॅम्पोस, समुपदेशक, ITU मानकीकरण क्षेत्र, जिनिव्हा, इलोना किकबुश, ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आणि डॉ. पॅट्रिक लुमुंबा ओसेवे, हेल्थ सेक्टर ग्रुप सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंज विभाग, ADB जिनिव्हा, यांनी चर्चासत्रात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाला केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, G20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि विकास भागीदार उपस्थित होते. वक्‍त्यांनी, नागरिक-केंद्रित आरोग्य सेवा प्रणालीकडे वळणे, सर्वांगीण आरोग्य सेवा मॉडेल्स एकत्रित करणे आणि पारंपरिक औषधांना पाठबळ देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची गरज अधोरेखित केली.

डिजिटल आरोग्यावरील कार्यक्रम आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे भाषण येथे पाहता येईल.  

 

G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1917776) Visitor Counter : 1003


Read this release in: English , Urdu , Hindi