पोलाद मंत्रालय

केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते होणार इंडिया स्टील 2023 चे मुंबईत उद्‌घाटन


पोलाद उद्योगातील ताज्या घडामोडी, आव्हाने आणि संधी यावर चर्चा करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश

Posted On: 18 APR 2023 7:16PM by PIB Mumbai

मुंबई, 18 एप्रिल 2023

केंद्रीय पोलाद मंत्रालयाने केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाचा वाणिज्य विभाग आणि फिक्कीच्या सहकार्याने 19-21 एप्रिल 2023 दरम्यान मुंबईत गोरेगाव येथे इंडिया स्टील 2023 या पोलाद उद्योगविषयक परिषद आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या उद्योगातील नेते, धोरणकर्ते आणि तज्ञ यांना या उद्योगातील ताज्या घडामोडी, आव्हाने आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

19 एप्रिल 2023 रोजी इंडिया स्टील 2023 च्या उद्घाटन समारंभात नागरी केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, पोलाद मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि फिक्कीचे अध्यक्ष शुभ्रकांत पंडा, भारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) च्या आणि फिक्की पोलाद समितीच्या अध्यक्ष सोमा मोंडल यांच्यासह इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यासोबतच आयोजित होणाऱ्या एका प्रदर्शनात पोलाद क्षेत्रात नव्याने दाखल झालेली उत्पादने आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.

या तीन दिवसांच्या कार्यक्रमात विविध विषयांवर आयोजित होणाऱ्या माहितीपर सत्रांच्या मालिकेत उपस्थितांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. इंडिया स्टील 2023 दरम्यान लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा, भारतीय पोलाद उद्योगासाठी मागणीचे स्वरुप, हरित पोलादासाठी शाश्वततेची उद्दिष्टेः भावी आव्हाने, भारतीय पोलाद उद्योगासाठी पोषक धोरणाचा आराखडा आणि चालना देणारे घटक आणि उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढीसाठी तंत्रज्ञानाचे तोडगे अशा विविध विषयावर महत्त्वाच्या सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत प्रमुख हितधारक आणि पोलाद उद्योगातील अग्रणींसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी पॅनेल चर्चा आणि गोलमेज चर्चांच्या मालिका देखील आयोजित केल्या जाणार आहेत, ज्यामुळे भारतातील पोलाद उद्योगाच्या भवितव्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अंतदृष्टी आणि दृष्टीकोन उपलब्ध होणार आहेत.

या द्वैवार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना या उद्योगातील नेत्यांशी संवाद साधण्याची, भविष्यातील वृद्धीच्या शक्यतांबाबत दृष्टीकोन जाणून घेण्याची आणि अतिशय झपाट्याने उदयाला येणाऱ्या भारतीय पोलाद उद्योग क्षेत्रात सहकार्याच्या संधीची चाचपणी करण्याची संधी देणारे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पोलाद उद्योगातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी गोलमेज चर्चांच्या मालिका देखील आयोजित केल्या जाणार आहेत.

केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते एका प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करणार आहेत जे या कार्यक्रमाच्या सोबतच आयोजित केले जात आहे. प्रदर्शनात भारतीय उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने आणि मार्गदर्शक उपाय यांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.

इंडिया स्टील 2023 प्रदर्शनात भारतीय उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने आणि खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांकडून मार्गदर्शक उपाय यांचे दर्शन घडवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सेल, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, एएम/एनएस इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, वेलस्पन कॉर्प आणि एल अँड टी, जिंदाल स्टेनलेस आणि इतर विविध आघाडीच्या उद्योग प्रतिनिधींसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनातून व्यापारासाठी एक जाळे निर्माण करण्याची आणि सहकार्याची संधी मिळण्याबरोबरच या क्षेत्रातील ताजे कल आणि या उद्योगाला आकाराला आणणारे नवोन्मेष यांची सर्वसमावेशक माहिती जाणून घेता येईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना या उद्योगातील नेत्यांशी संवाद साधण्याची, भविष्यातील वृद्धीच्या शक्यतांबाबत दृष्टीकोन जाणून घेण्याची आणि अतिशय झपाट्याने उदयाला येणाऱ्या भारतीय पोलाद उद्योग क्षेत्रात सहकार्याच्या संधीची चाचपणी करण्याची संधी देणारे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

याशिवाय इंडिया स्टील 2023 मध्ये या उद्योगाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गोलमेज चर्चासत्रांचे आयोजन होणार आहे.वैशिष्ट्यपूर्ण पोलाद 2.0 साठी पीएलआयसाठी या चर्चासत्रात अभिप्राय मागवले जातील आणि नव्या क्षेत्रांची आणि दुसऱ्या टप्प्यातील उत्पादनांची चाचपणी करताना पहिल्या टप्पाच्या फलनिष्पत्तीबाबत चर्चा केली जाईल.कच्च्या मालाची सुरक्षा आणि निम्न दर्जाच्या लोहखनिजाचा वापर या गोलमेज चर्चासत्रात लोहखनिजाचे लाभ आणि कच्च्या मालाची समस्या आणि दरांमध्ये होणाऱ्या चढउतारांची हाताळणी यावर चर्चा होईल.बांधकाम क्षेत्रात पोलादाचा वापर वाढवणे या चर्चासत्रात नव्याने उदयाला येणाऱ्या पोलादाच्या गरजांवर चर्चा करण्यासाठी उद्योगातील तज्ञ एकत्र येतील आणि या क्षेत्रात पोलादाचा वापर वाढवण्यासाठी योजनांची माहिती देतील. या क्षेत्रातील सहकार्याची चाचपणी, गरजा ओळखणे आणि भारतीय पोलाद क्षेत्राच्या क्षमतेचे दर्शन घडवणे हेआंतरराष्ट्रीय खरेदीदारांसोबत पोलाद उद्योगाची गोलमेज या चर्चासत्राचे उद्दिष्ट आहे. सर्वात शेवटीचक्राकार अर्थव्यवस्था आणि पोलाद उद्योगातील उप-उत्पादनांचा वापर या चर्चासत्रात पोलादनिर्मिती, तंत्रज्ञानाचा शोध आणि संभाव्य क्षेत्रांमध्ये वापर वाढवण्याला प्रोत्साहन याविषयी चर्चा होईल.

इंडिया स्टील 2023 विषयी अधिक माहितीसाठी आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी कृपया www.indiasteelexpo.in येथे भेट द्या.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1917731) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi