युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

मिशन ऑलिंपिक सेल ने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पदक विजेता अविनाश साबळे याच्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला दिली मान्यता

Posted On: 13 APR 2023 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS) मिशन ऑलिंपिक सेल (MOC) ने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्य पदक विजेता अविनाश साबळे याच्या स्वित्झर्लंडमधील सेंट मोरिट्झ येथे या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

साबळेच्या स्वित्झर्लंड प्रशिक्षण शिबिराचा खर्च युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (TOPS) योजने  अंतर्गत केला जाणार आहे. अविनाश आणि त्याच्या प्रशिक्षकाचे विमान भाडे, व्हिसा फी, स्थानिक वाहतूक खर्च, बोर्डिंग आणि लॉजिंग खर्च आणि इतर खर्चासह आउट ऑफ पॉकेट अलाउन्स देखील (OPA) कव्हर केला जाणार आहे.

साबळे, त्याचे प्रशिक्षक स्कॉट सायमन्स हे दोघे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी हंगेरीतील बुडापेस्ट ला प्रयाण करण्यापूर्वी स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ येथे प्रशिक्षणासाठी 7 ऑगस्ट 2023 ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान (10 दिवस) वास्तव्यास राहतील.

मिशन ऑलिंपिक सेल ने साबळे याच्या प्रस्तावाव्यतिरिक्त 8 टेबल टेनिस पटूंच्या विविध डब्ल्यूटीटी आयोजनात भाग घेण्यासाठीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.

प्रस्ताव मंजूर झाले आहेत असे TOPS टेबल टेनिसपटू -

1) मनिका बत्रा - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

2) साथियान ज्ञानसेकरन - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

3) पायस जैन - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

4) मानुष शाह - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

5) श्रीजा अकुला - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

6) अर्चना कामथ - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

7) यशस्विनी घोरपडे - डब्ल्यूटीटी युवा स्टार स्पर्धक पॉडगोरिका आणि डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

8) दिया चितळे - डब्ल्यूटीटी स्टार स्पर्धक बँकॉक, थायलंड

TOPS मध्ये टेबल टेनिसपटूंचे विमान भाडे, व्हिसा फी, स्थानिक वाहतूक खर्च, बोर्डिंग आणि लॉजिंग खर्च यासह इतर खर्चाचा समावेश आहे.

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1916378) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi