संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फ्रान्समध्ये माँट दे मार्सन येथे होणाऱ्या ओरायन या बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय सरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी

Posted On: 13 APR 2023 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

फ्रान्सच्या हवाई तसेच अवकाश दलाच्या (एफएएसएफ)माँट दे मार्सन या हवाई तळावर आयोजित ओरायन या सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाचे (आयएएफ)पथक उद्या फ्रान्सला रवाना होणार आहे. दिनांक 17 एप्रिल ते 05 मे 2023 या काळात होणाऱ्या या हवाई सरावामध्ये चार राफेल विमाने, दोन सी-17 प्रकारची तसेच दोन आयआय-78 प्रकारची विमाने यांच्यासह  165 हवाई योद्ध्यांचे भारतीय हवाई दलाचे पथक सहभागी होईल. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने परदेशी हवाई सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आयएएफ आणि एफएएसएफ यांच्यासह, जर्मनी,ग्रीस,इटली,नेदरलँड्स,युके,स्पेन आणि अमेरिका या देशांच्या हवाई दलांची पथके देखील या बहुपक्षीय सरावात सहभागी होणार आहेत. या संयुक्त सरावात सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलातील सदस्यांना इतर देशांच्या हवाई दलांमधील सर्वोत्तम पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळेल आणि त्यातून भारतीय हवाई दलाची कार्यशैली आणि डावपेच अधिक समृद्ध होतील.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916349) Visitor Counter : 211


Read this release in: English , Urdu , Hindi